नगर टेंभुर्णी हायवेवरील करमाळा येथील मौलाली माळ येथे खड्ड्यांमुळे दुचाकींचा झाला अपघात
करमाळा-प्रतिनिधी
नगर ते टेंभुर्णी हायवे हा खड्ड्यांमुळे दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. अशा प्रकारच्या मथळ्याखाली संघर्ष न्यूज सोलापूरने काही दिवसांपूर्वीच एक बातमी लावली होती. त्यापूर्वीही खड्ड्यांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल वारंवार विविध वृत्तपत्राच्या पत्रकारांनी सोलापूरने बातम्या प्रसारित केल्या आहेत. परंतु प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतली नाही. त्याचीच परिणीती म्हणून आज नगर-टेंभुर्णी हायवे वरील करमाळा येथील मौलाली माळ येथे खड्ड्यांचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य निर्माण झाले आहे. व नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम येथील प्रशासनिक अधिकारी यांच्यावतीने केले गेलेले आहे. येथे पडलेल्या खड्ड्यांमध्ये माती टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या मोठमोठ्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. व त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांनाही धुळीमुळे श्वसनाचा त्रास होण्याचा धोका व याठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही.
या सर्वांची परिणीती म्हणून या ठिकाणी पडलेले खड्डे चुकवत असताना, देवळाली येथील तीन ते चार व्यक्ती अपघात होऊन किरकोळ जखमी झालेले आहेत. या ठिकाणी पडलेले खड्डे चुकवत असताना अचानक तीन मोटार सायकली एकमेकास धडकल्या. व या धडकेमध्ये तीन ते चार व्यक्ती किरकोळ जखमी झालेली आहेत. रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. व या वाहतुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी कोणताही मोठा अपघात होण्याची शक्यता आज नाकारता येत नव्हती. परंतु मौलाली माळ येथील दुकानदार यांनी वेळेचे गांभीर्य ओळखून, त्वरित अपघात झालेल्या व्यक्तींना रस्त्याच्या बाजूला सारले. व त्यांची विचारपूस केली. त्यावेळेस सदरील व्यक्तींना किरकोळ जखमा झाल्याचे दिसून आले. परंतु या खड्ड्यांमुळे टेंभुर्णी ते नगर व त्या अर्थी करमाळा तालुक्यामध्ये मोठा अपघात, जीवित हानी अथवा आर्थिक हानी टाळता येणार नाही. हेही तितकेच खरे आहे…..
