कुंकू गल्ली येथील आजिनाथ रंगनाथ गाठे यांचे दुःखद निधन.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील कुंकू गल्ली येथील रहिवासी शिंपी समाजाचे ज्येष्ठ सदस्य आजिनाथ रंगनाथ गाठे वय ६८ यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या मृत्यू पश्चात पत्नी दोन मुले सुना भाऊ भावजय पुतणे असा परिवार आहे.महावितरणमधील कर्मचारी प्रशांत गाठे एसटी विभागातील मॅकनिक प्रवीण गाठे यांचे वडील होते. त्यांची अंत्ययात्रा कुंकू गल्ली येथील राहत्या घरापासून दुपारी दोन वाजता निघणार आहे. प्रेमळ मनमिळावू हसतमुख स्वभाव असलेल्या आजिनाथ गाठे यांचे दुःखद निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.अजिनाथ गाठे नवनाथ गाठे पांडुरंग गाठे यांचे बंधू कमलादेवी देवस्थानचे व्यवस्थापक अशोक गाठे एसटी विभागातील मॅकनिक औदुंबर गाठे यांचे चुलते होते.
