ताज्या घडामोडीराजकीयसकारात्मक

आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गाच्या(EWS) प्रथम वर्षाच्या रिक्त जागा थेट द्वितीय वर्षासाठी ग्राह्य- प्रा.रामदास झोळ

शैक्षणिक वर्ष 2019-2020 पासुन केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) प्रर्वगासाठी 10% अतिरिक्त कोटा सर्व व्यवसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रथम वर्ष प्रवेशासाठी देण्यात आला होता, परंतु त्यातील रिक्त राहिलेल्या जागा थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी धरण्यात याव्या अशी मागणी असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंट आॅफ अन्एडेड इन्स्टिट्युट इन रुरल एरिआ चे अध्यक्ष प्रा.रामदासजी झोळ सर यांनी केली‌.
यासंदर्भात मागिल वर्षी अखिल भारतीय तंञ शिक्षण परिषद (AICTE) नवी दिल्ली या केंद्रस्तरीय परिषदेकडे पाठपुरावा केला व त्यांनी हि मागणी मान्य केली, त्यामुळे शैक्षणिक वर्ष 2020-2021 साठी त्या रिक्त जागा ग्राह्य धरण्यात याव्यात असे AICTE च्या माहिती पुस्तका मध्ये नमुद केले. त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री उदयजी सामंत, तंञशिक्षण संचालनालयाचे संचालक डाॅ.अभयजी वाघ, सचिव उच्च व तंत्र शिक्षण विभाग, आयुक्त राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल), सेक्रेटरी प्रवेश नियामक प्राधिकरण यांना प्रा. रामदास झोळ यांनी प्रत्यक्ष भेटुन व पञ व्यवहार करुन ह्या मागणीला यश मिळविले आहे.
यावेळी प्रा.झोळ सर म्हणाले की सर्व पदवी व पदविका महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रर्वगाच्या(EWS) 10% रिक्त राहिलेल्या जागा थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. याचा फायदा मराठा समाजासह खुल्या प्रवर्गातील इतर विद्यार्थ्यांना होणार असून होणार असुन त्याचा फायदा येण्यासाठी विद्यार्थ्यांनी आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गाचे (EWS) प्रमाणपत्र लवकरात लवकर मिळवुन ह्या मिळालेल्या अतिरिक्त जागांचा फायदा उठवावा.
error: Don\'t try to copy. Content is protected !!