देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चिखलठाण ये्थील रक्तदान शिबीरात एकशे एक रक्तदान संप्पन्न – चंद्रकांत काका सरडे
करमाळा प्रतिनिधी
कोरोनाच्या पाश्वभुमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री.उद्धव ठाकरे साहेब व आरोग्यमंत्री मा.श्री.राजेश टोपे साहेब यांनी केलेल्या रक्तदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, देशाचे नेते, माजी केंद्रीय कृषीमंत्री,माजी मुख्यमंत्री,महाविकास आघाडीचे शिल्पकार पद्मविभुषण मा.ना.शरदचंद्र पवारसाहेब यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्ताने चिखलठाण गावचे सरपंच तालुक्याचे नेते चंद्रकांत काका सरडे यांनी सामाजिक उपक्रमांद्वारे वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प करून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात गावातील युवक शेतकरी ग्रामस्थ यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन एकशे एक रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे .या रक्तदान शिबीराचे उद्घघाटन चिखलठाण गावचे सरपंच मा.श्री. चंद्रकांत (काका)सरडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमास आप्पासाहेब सरडे,अमोल मराळ,गणेश कळसाईत,राजेंद्र कांबळे,सुनिल ठोंबरे,अरुण पवार,राहुल कांबळे,अक्षयकांबळे,सुनिलकुचे
