Thursday, April 17, 2025
Latest:
करमाळासहकार

करमाळा विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी सांवत गटाचे मनोज गोडसे तर व्हा चेअरमन पदी संतोष बनकर

करमाळा प्रतिनिधी
करमाळा विविध कार्यकारी सोसायटी च्या चेअरमन व व्हा चेअरमन पदाची निवडणुक आज सहाय्यक निबंधक सहकारी संस्था करमाळा या कार्यालयात सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणुक निर्णय अधिकारी सौ,एस के मुंडे यांच्या अध्यक्ष ते खाली पार पडली
यावेळी अध्यक्ष, पदासाठी मनोज गोडसे यांचा एकमेव अर्ज़ आला असुन या अर्जावर सुचक सुनील बापु सावंत तर अनुमोदक म्हणुन नागेश कोडींराम उबाळे यांनी सही केली तर उपाध्यक्ष पदासाठी संतोष बनकर यांचाही एकमेव अर्ज़ आला असुन या अर्जावर सुचक चंद्रकांत सामसे व अनुमोदक म्हणुन उमेश हवालदार यांनी सहया केल्या
निवडणुक निर्णय अधिकारी सौ,एस, के, मुंडे यांनी अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी दोनच अर्ज़ आल्याने गोडसे व बनकर यांची निवड घोषित केली यावेळी सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे सांवत गटाचे नेते सुनील बापु सावंत,हरीभाऊ फंड, अशोक ढवळे, नागेश उबाळे, योगेश काकडे, दासा मंडलीक, संगीता मार्तण्ड सुरवसे,आरती बालाजी चांदगुडे, उमेश हवालदार चंद्रकांत सामसे सचिव नवनाथ चौधरी,निलावती कांबळे,आदी जण उपस्थित होते
सदर निवड झाल्यावर नुतन अध्यक्ष गोडसे व उपाध्यक्ष बनकर यांनी सावंत कार्यालयात येऊन कै, सुभाष आण्णा सावंत यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन त्यांचे दर्शन घेतले यावेळी छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने सावंत कार्यालयात माजी समाज कल्याण अधिकारी गोपाळराव सावंत यांच्या शुभहस्ते अध्यक्ष गोडसे व उपाध्यक्ष बनकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी झालेल्या सत्कार संभारंभाच्या कार्यक्रमात बोलताना सुनील बापु सावंत म्हणाले की,आम्ही कै, सुभाष आण्णा सावंत यांच्या विचाराचा एका सामान्य कुंटबातील कार्यकर्तेला चेअरमन करुन काम करण्याची संधी उपलब्ध करुन दिली सर्व सामान्य कार्यकर्ता हीच खरी सावंत गटाची ताकद आहे असे ते यावेळी म्हणालेयावेळी नगरसेवक संजय सावंत,, मनोज राखुंडे,देवा लोंढे संतोष बनकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी हनुमंत सावंत,बाळासाहेब रोडे शिवाजी ढाणे, गणेश झोळे,रामा कंरडे सिंकदर सय्यद, प्रकाश सुपेकर कल्याण ढाणे बबलु दुधाट परशुराम तांबे,कदीरभाई शेख शुभम बनकर संतोष देशमाने राजेन्द्र वीरआदी जण उपस्थित होते यावेळी फारुक जमादार यांनी सर्वाचे आभार मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group