निवारा बालगृहाचे कार्य कौतुकास्पद असुन समाजाच्या कल्याणासाठी प्रत्येकानी सहकार्य करणे गरजेचे -हरीश्चंद्र खाटमोडे
करमाळा प्रतिनिधी निवारा बालगृहाचे कार्य कौतुकास्पद असुन सामाजिक बांधिलकीच्या भावनेतुन समाजाचे ऋण फेडण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने समाजासाठी खारीचा जरी वाटा उचलला तर खऱ्या अर्थाने समाजाचा सर्वागिंण विकास झाल्याशिवाय राहणार नाही असे मत मकाईचे कार्यकारी संचालक हरिश्चंद्र खाटमोडे यांनी व्यक्त केले.
निवारा बालगृहात हरिश्चंद्र खाटमोडे मित्र परिवाराच्यावतीने वाढदिवसाच्या आयोजित सत्कार संमारंभ कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की मागील पाच वर्षापासून प्रत्येक वर्षी माझे सहकारी मित्र सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करीत असुन मी निवारा बालगृहास स्वयंसेवक आर्थिक मदत करीत होतो. परंतु प्रत्यक्षपणे त्यांचे कार्य पाहिले नव्हते, म्हणून सर्व सहकारी मित्रांनी एकत्र येवून माझा वाढदिवस निवारा बालगृहात साजरा करण्याचे ठरवुन सर्वानी एकत्र येवून रु. ११०००चे किराणा साहित्य संस्थेस देवून त्या ठिकाणी मूलासमवेत वाढदिवस साजरा केला आहे. ॲड. अरूण जाधव यांनी मोहफाटा ता. जामखेड येथे विना अनूदानित तत्वावर चालवलेले ५७ मुलांचेबालगृह व तेथील सुविधा पाहता ते कौतुकास्पद आहे. यापुढे ही आम्ही या संस्थेस आम्ही दरवर्षी सर्व मुलाना नवीन ड्रेस देणार आहे.या कार्यक्रमात हरीश्चंद्र खाटमोडे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास श्री ॲड. जाधव, श्री. चव्हाण,श्री केसकर, सौ.केसकर, श्री. सचिन खेडकर,लहुतनपुरे सर, अनिल भोसले सर, सचिन धायवळ आदिमित्र परिवार उपस्थित होते..
