करमाळा तालुक्यातील मिरगव्हाण येथील अक्षय गौतम ओहोळ यांनी स्वबळावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बी .ए परिक्षेत मिळवले घवघवीत यश
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील मिरगव्हाण येथील अक्षय गौतम ओहोळ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शिक्षण घेऊन बी ए परिक्षेत इतिहास विषयात ७२% गुण मिळवून मोठे यश मिळवले आहे.
जीवनामध्ये खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचे असेल तर जिद्द चिकाटी परिश्रम याची गरज असून त्यासाठी कुठल्याही प्रकारची परिस्थिती आडवी येत नाही.अक्षयने घरची परिस्थिती सर्वसाधारण असताना करमाळा येथील डाॅ रविकिरण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पवार जनरल हॉस्पिटल येथे कोरोनाकाळाच्या आधीपासून काम करीत स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पार पाडुन अभ्यास करून त्यांनी यश मिळवले आहे.
बीए परीक्षेत 72 टक्के मार्क मिळवुन त्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ अरुण अडसुळ विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर अध्यक्ष मिलिंद फंड सर प्राचार्य डॉक्टर एल बी पाटील विद्या विकास मंडळाच्या विश्वस्त भाजप प्रदेश महिला उपाध्यक्ष यांच्या हस्ते अक्षय ओहोळ याला पदवीचे प्रमाणपत्र घेऊन त्याचा सन्मान करण्यात आला. त्यांनी मिळालेल्या याच्याबद्दल त्यांनी त्याचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
