करमाळा

करमाळा तालुक्याचे पश्चिम भागातील पहिले भारत सरकार-नोटरी म्हणुन ॲड.अजित विघ्ने यांना बहुमान


करमाळा प्रतिनिधी- करमाळा तालुक्याचे पश्चिम भागातील केत्तुरचे रहिवाशी ॲड. अजित विघ्ने यांना भारत सरकार-नोटरी होणेचा बहुमान प्राप्त झालेला असुन, आजपर्यंत करमाळ्याचे पश्चिम भागात कोणीही नोटरी नव्हते. यामुळे या भागातील लोकांना भिगवण, बारामती, इंदापुर तसेच कर्जत , टेंभुर्णी अशा ठिकाणी दस्त नोंदणी व इतर महत्वाचे कामी जावे लागत होते. परंतु आता ही सुविधा केत्तुर येथेच चालु झाली असुन, नुकतेच भारत सरकार नोटरी पदावर ॲड. अजित विघ्ने यांची नेमणुक झालेली आहे. त्यांचे सर्व स्तरांतुन अभिनंदन होत असुन. त्यांनी पॅनल ॲडव्होकेट म्हणुन जिल्हा परिषद , पंचायत समिती करमाळा, स्टेट बँक ऑफ इंडिया , जलसंपदा विभाग येथे काम केलेले असुन, विविध अशासकीय कमिटी वर देखिल ते कार्यरत आहेत. वकीली व शेती बरोबरच ते राजकीय क्षेत्रातही काम करतात. केत्तुर गावचे माजी सरपंच पदासह विविध पदे त्यांनी भुषिवली असुन. केत्तुर येथेच आता विविध प्रकारचे दस्त , करार वैगेरे भारत सरकार, नोटरी या नात्याने केत्तुर येथेच नोंदविले जाणार असल्याची माहीती त्यांनी दिली.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group