करमाळा

.सौ.मनिषा साठे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा.

करमाळा प्रतिनिधी 
करमाळा शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सौ.मनीषा अजित साठे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी विविध स्तुत्य उपक्रम राबविले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते श्री.बाळासाहेब गोरे गुरुजी यांनी निराधार व्यक्तींसाठी करमाळा येथे नव्याने सुरू केलेल्या वृद्धाश्रमातील व्यक्तींसाठी सतरंजी वाटप करून सौ.साठे यांनी आज त्यांच्या वाढदिवसाची सुरुवात केली.यावेळी त्यांनी प्रत्यक्ष वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील वृद्ध लोकांची आस्थेने विचारपूस केली.त्यांच्याशी हितगुज केले.श्री.गोरे गुरुजी यांनी राबवलेल्या उपक्रमाचे त्यांनी यावेळी कौतुक केले.तसेच येथून पुढेही वेळोवेळी आपल्या परीने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
मुक्या प्राण्याविषयी त्यांच्या मनात नेहमीच तळमळ असते हे ही यावेळी दिसून आले.श्रीयुत श्रेणिक खाटेर यांच्या गो शाळेत जाऊन तेथील गाईंना हिरवा चारा वाटून आपल्या जन्मदिवसाचा आनंद त्यांनी द्विगुणित केला.वाढदिवसाचे औचित्य साधून त्या प्रत्येक वर्षी गो शाळेत चारा वाटप करत असतात.
सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सौ.साठे आपल्या कुटुंबियांच्या वाढदिवसानिमित्त असेच विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात.त्यांच्या या उत्कृष्ट कार्याचे सर्वांनी कौतुक केले.
याप्रसंगी सौ.साठे यांच्या सोबत सौ.स्मिता आवटे,सौ.शारदा परदेशी,श्रीमती ज्योती पांढरे,सौ.वैशाली जाधवर,सौ.सविता चिवटे,सौ.कविता नीळ, कुमारी अभिज्ञा साठे,सौ.अंजली वांगडे,सौ.संजीवनी साठे,सौ. सुकेशनी पाटील उपस्थित होत्या.

error: Don\'t try to copy. Content is protected !!