आमचे काका कै. अजिनाथ गाठे आमच्या कुटुंबाचा आधारवड यांना भावपुर्ण आदरांजली
गुरुवार दिनांक२२.८.२०२४ रोजी आमचे चुलते काका अजिनाथ रंगनाथ गाठे (बाबा) यांना देवाज्ञा झाली .
बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना अतिशय दुःखद अशा मनस्थितीने श्रध्दाजली अर्पण करीत आहे .
माझ्या सहवासातील बाबांच्या भरपूर अशा आठवणी आहेत.
बाबा आमच्या काकांपैकी सर्वात लहान त्यामुळेच बाबा आमचा जास्त लाड आणि कौतुक करायचे.
बाबांचे शिक्षण जुनी ssc १० वी असून सुद्धा जेमतेम परिस्थितीमुळे बाबांना व्यवसाय किंवा शासकीय नोकरी करता आली नाही .
तरी पण खाजगी नोकरी करून प्रामाणिक कष्ट करून त्यांच्या दोन लहान मुलांना शैक्षणिक शिक्षण व औद्योगिक प्रशिक्षण देऊन आज दोन्ही मुल शासकीय सेवेत रुजू आहेत. पहिला मुलगा प्रशांत गाठे हा M S E B मध्ये शासकीय सेवेत आहे . व प्रशांत गाठे हा M. P. S .C .स्टडी अभ्यास करीत आहे . दुसरा मुलगा प्रविण गाठे एसटी महामंडळ करमाळा येथे शासकीय सेवेत आहे . तसेच बाबांच्या दोन्हीही सुना सौ. दिपा प्रशांत गाठे .व सौ. अमृता प्रविण गाठे. अंगणवाडी मदतनीस म्हणून करमाळा येथे सेवेत आहेत. सर्व काही ठीक सुरू असतानाच म्हणतात ना ईश्वरी शक्ती पुढे माणसाचे काय पण कोणाचेच काही चालत नाही. आणि बाबांना अल्पशा आजाराने देवाज्ञा झाली.
मला चांगले आठवते आहे कि ज्यावेळेस मी लहान होतो,
मला सायकल चालवण्यासाठी बाबांनीच मला प्रेरित केले होते, त्याकाळी स्वतःची सायकल नसायची,त्यावेळी सायकल तासांवर मिळायची,सायकल मार्ट
दुकान दार लहान मुलांना सायकल देत नसायचे ,त्यावेळेस मी बाबांकडे हट्ट करायचचो आणि वेताळपेटीतील दोन सायकल मार्ट होते, पैकी एका सायकल मार्ट येथुन बाबा मला तासिक वर सायकल घेऊन द्यायचे.
अशा परिस्थितीत सायकल शिकलो .
बाबा नेहमी मला म्हणायचे कि सायकल जपून चालवत जा पण मी लहान असल्याकारणाने त्यावेळेस मी त्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून एका वर्षी आषाढी एकादशी दिवशी संगोबा येथे सायकलवर जात असताना खांबेवाडी जवळ पडलो होतो. बाबा हे मला घेण्यासाठी खांबे वाडी येथे आले होते . आणि मला त्यांनी ताकीद दिली होती की इथून पुढे इतक्या लांब सायकलवर जायचे नाही.
यानंतर कालांतराने माझा विवाह झाला. मला गौरी आणि वैष्णवी या मुली वैवाहिक जीवनामध्ये प्राप्त झाल्या . बाबा त्यांच्या
नातीचे लाड व कौतक ही फार करीत असत.
नंतर माझी श्रीजगदंबा कमलादेवी मंदिर समिती मध्ये माझी व्यवस्थापक म्हणून नियुक्ती झाली ,त्या वेळेस बाबांना अत्यानंद झाला होता.बाबा नेहमी गल्लीतील आणि त्यांच्या मित्र परिवारा मध्ये बोलायचे की अशोक मंदिरामध्ये व्यवस्थापक म्हणून आहे .
बाबांचे त्यांच्या मुलांन वर जेवढे प्रेम होते तेवढेच प्रेम आमच्यावर ही होते .
आज सत्य हे आहे की आम्ही बाबांच्या या प्रेमाला परके झालो आहोत . तरीपण बाबांचे आशिर्वाद आणि प्रेम आमच्यावर असणारच आहे .अंतिम सत्य मृत्यू यालाच आपण देवाज्ञा दुःखद निधन असेही म्हणतो .
ईश्वर चरणी एक प्रार्थना आहे की आमचे बाबा कै.*अजिनाथ रंगनाथ गाठे.*स्वर्गाकडे येत आहेत, स्वर्गा चे दार उघडे असु दे .
*बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली .*
अशोक गाठे.
श्रीदेवीचामाळ करमाळा.
मो नं ९४०४७०८९२४
