आमदार संजयमामा शिंदे यांचे वाढदिवसानिमित्त केत्तुरच्या किर्तेश्वर मंदीरात कार्यकर्त्याकडुन अभिषेक आणि महाप्रसाद
– करमाळा प्रतिनिधी- करमाळा तालुक्यातील सर्व गावातुन आज ३१ जुलै रोजी आमदार. संजयमामा शिंदे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. मौजे. केत्तुर येथील पुरातन असणाऱ्या श्री. किर्तेश्वर मंदीरात संजयमामा शिंदे मित्रमंडळ आणि कार्यकर्ते यांचे हस्ते ” अभिषेक” घालण्यात आला. अभिषेक दौंड अग्रोचे शेती अधिकारी श्री. उदयसिंह पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नि सौ. मंजुरीताई पाटील या उभयतांचे हस्ते व मान. दादासाहेब निकम, शिवाजीराव पाटील, अॅड. अजित विघने, दत्तात्रय कोकणे, लक्ष्मीकांत पाटील, विजय येडे, बाळासाहेब जरांडे, पंडीत माने, गणपतराव पाटील, रामभाऊ देवकते साहेब, राजेंद्र माळवे, शहाजी कोकणे व ग्रामस्थांचे उपस्थित पार पडला यावेळी पौरोहित्य सुमंत काका यांनी केले. याप्रसंगी महाप्रसादाचे देखिल नियोजन केलेले होते. या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा दुध संघाचे संचालक राजेंद्रसिंह ऊर्फ अशोक पाटील, देवराव नवले, दादासाहेब निकम, राम देवकते,प्रशांत नवले, लक्ष्मीकांत पाटील, ॲड अजित विघने, सुहास निसळ,दत्तात्रय कोकणे, विजय येडे, उदयसिंह पाटील , अनिल राऊत यांनी केले होते.
