पशुवैद्यकीय डॉक्टर अमृत बाळनाथ जाधव यांचे दुःखद निधन
करमाळा प्रतिनिधी जवळा येथील रहिवासी पशुवैद्यकीय डॉक्टर अमृत बाळनाथ जाधव रा. जवळा, हल्ली राहणार गणेश नगर करमाळा कल्पवृक्ष महिला नागरी पतसंस्थेच्या सचिव सविता जाधव यांचे पती यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे .अंत्य संस्कार काल जवळा या मुळ गावी संपन्न झाला.त्यांच्या मृत्यूपश्पचात पत्नी, दोन मुले, वडील, भाऊ वहिनी पुतण्या असा परिवार आहे त्यांच्या अंत्यसंस्काराला पंचक्रोशीतील लोक मोठ्या संख्येने हजर होते. मनमिळाऊ हसतमुख प्रेमळ स्वभावाचे असणारे डॉक्टर आप्पा या नावाने परिचित होते. डॉक्टर अमृत जाधव यांच्या अकाली जाण्याने जाधव परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आकस्मिक निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
