करमाळा

गोर-गरीब,निराधार, वंचित, सामाजिक दुर्बल घटकातील लोकांना धान्य वाटप सामाजिक स्तुत्य उपक्रम

सोलापूर (दि.01) योगा विद्या प्राणिक हिलिंग फाउंडेशन ऑफ महाराष्ट्रा, मास्टर चोवा कोक सुई व फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा यांच्या विद्यमाने फूड फॉर हंगरी या संकल्पनेतून निराधार, सामाजिक दुर्बल घटकातील महिला व पुरुषांना धान्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन दयानंद कॉलेज रोड, भवानी पेठ येथील फॅमिली प्लँनिंगच्या मुख्य कार्यालयात करण्यात आले होते.*यावेळी व्यासपीठावर फॅमिली प्लॅनिंगचे चेअरपर्सन डॉ. एन. बी. तेली, मार्गदर्शक डॉ. श्रीकांत येळेगावकर, इम्प्रेसोना समुपदेशन केंद्राच्या समुपदेशीका कमल शहा, एफ. पी. ए. आय सोलापूर शाखेचे माजी उपाध्यक्ष डॉ. मधुकर लोखंडे, सिद्धाराम कोतली, संगमेश्वर रघोजी, युवा प्रतिनिधी ऐश्वर्या सावंत, शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड आदी उपस्थित होते.यावेळी सोलापूर शहराच्या विविध भागातील गोर -गरीब, निराधार, वंचित, उपेक्षित, सामाजिक दुर्बल घटकातील 30 महिला व पुरुषांना मान्यवरांच्या हस्ते धान्य वाटप करण्यात आले.यावेळी इम्प्रेसोना समुपदेशन केंद्राच्या समुपदेशिका कमल शहा म्हणाल्या की, आज देखील आपल्या देशात अनेक लोक उपाशीपोटी झोपतात. त्यांना एक वेळचे अन्न देखील मिळत नाही. आपण शिकलो, सवरलो मोठे झालो म्हणून समाजाकडे पाठ फिरवायची नसते. आपल्या कमाईचा एक हिस्सा गोर -गरीब, निराधार, वंचित, उपेक्षित, सामाजिक दुर्बल घटकासाठी राखून ठेवावा. त्यांना एक वेळचे अन्न उपलब्ध करून दिल्यास पुण्य लाभते.*डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी अध्यक्षीय समारोप करताना योगा विद्या प्राणिक हिलिंग फाउंडेशन ऑफ महाराष्ट्रा, मास्टर चोवा कोक सुई या संस्थांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध सामाजिक स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे स्वागत डॉ. एन. बी. तेली यांनी केले. प्रास्ताविक सुगतरत्न गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन वीरेंद्र परदेशी यांनी केले तर आभार ऐश्वर्या सावंत यांनी मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group