करमाळा शहरात सावंतगटाच्या वतीने हाज यात्रेकरूंचा सत्कार
करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील सावंत कार्यालयात आज शहरातील सौदी अरेबिया येथे हाज यात्रेसाठी जाणारे हाज यात्रेकरूंचा सत्कार सावंत गटाच्या वतीने नगरसेवक संजय सावंत यांच्या शुभहस्ते कदीरभई शेख, इस्माईल बागवान,मौला तांबोळी,बद्रूद्दीन बागवान,बकशभईशेख या हाज यात्रेकरूंचा टोपी हाजी रूमाल फुल देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी करमाळा अर्बन बॅकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार,कै,नामदेवराव जगताप उव्दु प्राथमिक शाळेचे शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष मजहर नालबंद, सामाजिक कार्यकर्ते वाजीद शेख, छत्रपती शिवाजी तरुण मंडळाचे कार्यकर्ते पांडुरंग सावंत, मैनुद्दीन बेग मैनुद्दीन शेख समीर वस्ताद साजीद बेग साजीद शेख आदी जणाच्या उपस्थित करण्यात आला
यावेळी बोलताना नगरसेवक संजय सावंत म्हणाले की, करमाळा शहर व तालुक्यातुन ज्या ज्या वेळी हाज यात्रेसाठी मुस्लिम बांधव जातात त्यावेळी त्यांचा सावंत गटाच्या वतीने सन्मान करण्यात येतो ही परंपरा माजी नगराध्यक्ष कै,डी,के, सावंत, कै अनंतराव आबा सावंत, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तथा हमाल पंचायत चे संस्थापक स्वर्गीय सुभाष आण्णा सावंत यांनी घालुन दिलेली परंपरा आम्ही तिसरी पिढीत ही जोपासत आहे मुस्लिम समाज व आमचे तीन पिढ्यापासुन संबंध असुन आम्ही सर्व भाऊ पंचायत समिती चे माजी सदस्य व हमाल पंचायत चे अध्यक्ष अडव्होकेट राहुल सावंत,शहर विकास आघाडीचे गटनेते सुनील बापू सावंत आदी जण जोपासत आहे.यावेळी म्हणाले यावेळी छत्रपती शिवाजी तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष नागेश उबाळे यांनी आभार मानले.
