भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिराचे उद्घघाटन भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना गणेश चिवटे म्हणाले की, मुत्सद्दी लोकनेते व कुशल प्रशासक म्हणून अटलजींनी स्वतःला सिद्ध केले. ज्येष्ठ संसदपटू आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या वाजपेयीजींनी देशातील लोकशाही शक्तिशाली करण्यात मोलाची भूमिका बजावली. राजकीय प्रतिस्पर्धींशीही मित्रत्व जपणारे भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त नेत्ररोग तपासणी व मोफत चष्मे वाटप हा घेतलेला उपक्रम अतिशय स्तुत्य असून यामुळे समाजितील गोरगरीब गरजू लोकांना याचा फायदा होणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल पवार व उपाध्यक्ष भैय्याराज गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती प्रतिष्ठान देवळाली व एच. व्ही देसाई हॉस्पिटल यांच्या सहकार्याने पार पडले.
एच. व्ही देसाई रुग्णालयाचे डॉ. चव्हाण व त्यांच्या सहकारी टीम सत्कार संयोजकांच्या वतीने करण्यात आला,
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पै.अफसर तात्या जाधव,तालुका सरचिटणीस नितीन झिंजाडे, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष सोमनाथ घाडगे, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष लक्ष्मण शेंडगे, देवळाली चे सरपंच धनंजय शिंदे , शहाजीबापू पाटील , अशोक गायकवाड, संदिपान कानगुडे, पै.सतीश बापू कानगुडे , संतोष गायकवाड , बंडूशेठ शिंदे, रमेश गायकवाड, सचिन कानगुडे, बाबू जगताप , तात्या जाधव गुरुजी, सर्जेराव गोसावी, विलास मोरे, पप्पू शेख, दत्तात्रय नलवडे, आरोग्य सेविका शितल साळवे यांच्यासह सर्व आशा सेविका व एच. व्ही देसाई हॉस्पिटल चे डॉक्टर व कर्मचारी आणि छत्रपती प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.