भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची गुरुकिल्ली -साध्वी प.पू अनुराधा दिदी शेटे पंढरपूरकर
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची गुरुकिल्ली असल्याचे मत प्रसिद्ध भागवत कथाकार साध्वी अनुराधा दिदी शेटे पंढरपूरकर यांनी व्यक्त केले. करमाळा येथील श्री गजानन महाराज मंदिराच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त 21 डिसेंबर ते 27 डिसेंबर भागवत ज्ञानयज्ञ कथेचे आयोजन श्री गजानन महाराज मंदिर समितीच्या वतीने श्रीमती रंजना कुरुलकर मॅडम यांच्यावतीने करण्यात आले होते .भागवत कथेचे यजमानपद सामाजिक कार्यकर्त श्रेणिकशेठ खाटेर नगरसेविका संगीता खाटेर यांना देण्यात आले होते.यावेळी पुढे बोलताना साध्वी भागवत कथाकार साध्वी अनुराधा शेटे पंढरपूरकर यांनी सांगितले की भागवत कथा ही कल्पवृक्षासारखी आहे जी आपल्या इच्छा पूर्ण करते.कथा म्हणजे कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्यासारखे आहे. श्रीमद भागवत कथेचे केवळ स्मरण केल्याने आपली सर्व पापे नष्ट होतात आणि आपल्याला अनंत पुण्य प्राप्त होते. देवांनाही श्रीमद भागवत कथा ऐकण्याची इच्छा असते. आणि मानवाला या कथेचे लाभ आणि आशीर्वाद सहज मिळू शकतात. केवळ श्रीमद भागवत कथा श्रवण केल्याने मानवाचे जीवन पूर्णतः कल्याणकारी होते. आणि दुःख दूर होते.
भागवत कथा ऐकल्याने आपले मन आणि शरीर शुद्ध होते असे म्हणतात. जो व्यक्ती भागवत कथा ऐकतो त्याला सुख-शांती प्राप्त होते. म्हणून माणसाने सतत भगवंताची आराधना व उपासना करावी आणि आयुष्यात एकदा तरी भागवत कथा ऐकावी. श्रीमद भागवत कथा श्रवण केल्याने आपल्या जन्मजन्मातील पापे नष्ट होतात व ती श्रवण केल्याने मनाचा आध्यात्मिक विकास होतो. आणि जिथे इतर युगात मोक्षप्राप्तीसाठी कठोर परिश्रम आणि परिश्रम करावे लागले, तिथे कलियुगात श्रीमद भागवत कथा ऐकूनच मोक्ष प्राप्त होतो. भागवत कथा ही कल्पवृक्षासारखी आहे जी आपल्या इच्छा पूर्ण करते.भागवत कथा ऐकल्याने आपले मन आणि शरीर शुद्ध होते असे म्हणतात. माणसाने सतत श्रीकृष्ण भगवंताची आराधना व उपासना करावी आणि आयुष्यात एकदा तरी भागवत कथा ऐकावी. श्रीमद भागवत कथा श्रवण केल्याने आपल्या जन्मजन्मातील पापे नष्ट होतात व ती श्रवण केल्याने मनाचा आध्यात्मिक विकास होतो. आणि जिथे इतर युगात मोक्षप्राप्तीसाठी कठोर परिश्रम आणि परिश्रम करावे लागले, तिथे कलियुगात श्रीमद भागवत कथा ऐकूनच मोक्ष प्राप्त होतो. भागवत कथेत श्रीकृष्ण जन्म सोहळा मोठ्या उत्साहात आनंदात संपन्न झाला . श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे यशस्वीपणे संयोजन संकेत खाटेर मोक्षा खाटेर चि.खुश यांनी केले असून श्रीकृष्ण जन्म सोहळा भाविकांनी यामध्ये नृत्य करीत श्रीकृष्ण नामाचा गजर करीत आनंदात उत्सव साजरा केला. भागवत कथा यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी गजानन महाराज मंदिर समितीचे पुजारी रवींद्र विद्वत, प्रदीप देवी, शशिकांत कुलकर्णी,नितेश देवी, संकेत खाटेर सौ.मोक्षा खाटेर वर्धमान खाटेर, नरेंद्रसिंह ठाकुर, दिनेश मडके गिरीश शहा ,गंधे काका,संतोष काका कुलकर्णी,स्वाती मसलेकर ,मनीषा मसलेकर,ॲड लता पाटील, मेघाली आडकर सुरेखा घाडगे ,स्वाती कापसे उषा महाजन ,शैलजा भणगे ,शुभदा शिलवंत, सुरेखा घाडगे, उषा महाजन यांनी परिश्रम घेत आहेत. भागवत कथेच्या प्रारंभी साध्वी परमपूज्य अनुराधा पंढरपूर यांची रथामधून करमाळा शहरातून बॅन्ड पथकासह भव्य सवाद्य मिरवणूक शोभायात्रा काढण्यात आली. श्री गजानन महाराज मंदिराच्या अकरावी वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या भागवत ज्ञानयज्ञ सोहळ्यात करमाळा शहर व तालुक्यातील स्त्री पुरुष यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. भागवत ज्ञानयज्ञ कथा सोहळा यशस्वीपणे संपन्न होत आहे. भागवत कथा समाप्ती शुक्रवारी २७ डिसेंबरला होणार असून भाविकांना महाप्रसाद देण्यात येणार आहे तरी याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनानंतर बऱ्याच वर्षानंतर करमाळ्यात भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा होत असून भाविक भक्तांनी या कार्यक्रमाच्या आयोजकांचे आभार मानुन कौतुक केले आहे.