Saturday, December 28, 2024
Latest:
करमाळा

भारताचे माजी पंतप्रधान भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्यावतीने अंगणवाडीतील चिमुकल्यांना शालेय साहित्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्या उपाध्यक्ष शशिकांत पवार यांनी व्यक्त केले ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या शंभराव्या जयंती निमित्त करमाळा शहरातील 17 अंगणवाड्या मधील मुला मुलींना साहित्य वाटप कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते .पुढे ते म्हणाले कीश्री. वाजपेयी नऊ वेळा लोकसभेवर तर दोनवेळा राज्यसभेवर निवडून आले होते हा त्यांचा विक्रमच म्हणावा लागेल स्वातंत्र्योत्तर काळात भारताचे अंतर्गत व परकीय धोरणास आकार देण्यात एक पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री, विविध स्थायी समित्यांचे अध्यक्ष व एक विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी समर्थपणे आपली भूमिका बजावली.
ब्रिटीश सत्तेला भारतातून पायउतार करण्यात महत्वाच्या ठरलेल्या 1942 मधील भारत छोडो चळवळीमध्ये सहभागी होऊन विद्यार्थी दशे पासूनच वाजपेयी यांनी राष्ट्रवादी राजकारणाचे धडे गिरवले. राज्यशास्त्र व कायद्याचे विद्यार्थी असलेल्या श्री. वाजपेयींना शालेय काळातच परकीय व्यवहारामध्ये रुची निर्माण झाली होती. त्यांनी ही आवड पुढे अनेक वर्ष जोपासली व विविध द्विपक्षीय व बहुपक्षीय व्यासपीठांवर भारताचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी ह्या कौशल्याचा उपयोग केला.
श्री. वाजपेयी हे एक कुशल पत्रकार ही होते
तसेच यावेळी पांजरपोळ गोरक्षण संस्थेमध्ये गाईंना चारा देण्यात आला.अंगणवाडी मध्ये साहित्य वाटप संजय अण्णा घोरपडे ,नगरसेवक संजय सावंत ,नगरसेवक महादेव अण्णा फंड ,भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब कुंभार ,सोशल मीडियाचे नितीन कांबळे ,भाजपा करमाळा तालुका संयोजक सौ. सुप्रिया नितीन कांबळे , किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकुर ,व्यापार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब होसिंग, दलित सेना जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव भोसले ,रासप जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते भाजपा जिल्हा सचिव श्याम सिंधी ,अध्यात्मिक आघाडी तालुकाध्यक्ष दिनेश मडके, अभियंता सेल चे महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक दयानंद बंडगर ,एडवोकेट प्रशांत बागल ,प्रमोद फंड, प्रदीप देवी, निलेश जोशी, मनोज कुलकर्णी, विकास गाडे, सतीश भिसे, श्रीकांत ढवळे ,अलीम बागवान ,सत्संग परिवाराचे सुजित क्षीरसागर ,पत्रकार अलीम शेख ,उद्योग आघाडी चे तालुका उपाध्यक्ष मनोहर बुऱ्हाडे, मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष किसन कांबळे ,नशा मुक्त अभियानाचे महेशकुमार वैद्य ,महेश शहाणे आदि जणांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!