रावगावचे सुपुत्र संतोष काळे यांना जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने दिल्या जाणारा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार
करमाळा रावगावचे सुपुत्र सध्या भोसरी येथे श्री टागोर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले श्री संतोष काळे सर यांना पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने दिल्या जाणारा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार राज्याचे अप्पर शिक्षण सचिव श्री दीपक शेलार यांच्या हस्ते करण्यात आला सदर पुरस्कार हा त्यांनी माध्यमिक विभागात केलेल्या उल्लेखनीय कामकाजाबद्दल देण्यात आला असून त्यांचे कार्य कौतुकास्पद असून त्यांच्या या पुरस्कारामुळे त्यांचे कौतुक रावगावचे सरपंच दादासाहेब जाधव उपसरपंच श्री विष्णु गर्जे त्याचबरोबर मकाई सहकारी कारखान्याचे माजी संचालक श्री प्रताप बर्डे सर पंडित जवाहलाल नेहरू विद्यालय चे मुख्याध्यापक कोळेकर सर व रावगावातील युवकांनी त्यांचे या पुरस्काराबद्दल अभिनंदन केले आहे.
