करमाळा

कुंभेज फाटा ते बाभूळगाव रस्त्यासाठी संपादित झालेल्या जमीनीचा मोबदला न मिळाल्याने उमरड मांजरगाव येथील शेतकऱ्यांचा अर्धनग्न आंदोलनाचा इशारा

 

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील उमरड व मांजरगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनी कुंभेज फाटा ते बाभूळगाव रस्त्यासाठी संपादित झाल्या असून त्यांना अद्यापही दोन गावातील शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नसून वारंवार मागणी करूनही शेतकऱ्यांना पंधरा दिवसात मोबदला दिला नाही तर तर 17 तारखेला सर्व शेतकरी सार्वजनिक बांधकाम कार्यालय करमाळा येथे अर्धनग्न आंदोलन करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले असून संबधित खात्यांना याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, व संबंधित सर्व विभागांना याबाबतचे निवेदन दिले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.

सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री,ग्रामविकासमंत्री,जिल्हाधिकारी,मुख्यकार्यकारी अधिकारी,प्रांताधिकारी,तहसिलदार करमाळा,पोलीस निरीक्षक करमाळा, सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा व संबंधित विभागांना देण्यात आल्या असून सदर निवेदनावर श्रीनिवास रामेश्वर पाटील,श्रीरंग केरु चौधरी,सुभाष केरु चौधरी,चंद्रकांत यशवंत भिल,रमेश तुकाराम गोडगे, नवनाथ केरु चौधरी, सतीश भानुदास चौधरी,चंद्रशेखर यशवंत पाटील,सदाशिव बाबा बदे,सुनिल हरिदास चौधरी, प्रकाश तुकाराम गोडगे,धनवंत यशवंत पाटील, आदि शेतकऱ्यांच्या सहया आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group