करमाळा नगरपालिकेने शहरातील मोकाट जनावंराचा बंदोबस्त करण्याची मागणी
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरात तालुक्यातील बहुसंख्य नागरीक हे शहरामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी येत असतात. तसेच शहरामध्ये विविध शाळा, विदयालय, महाविदयालये असून विदयार्थ्यांची ही मोठी वर्दळ असते अशा परिस्थितीत करमाळा शहरात मोकाट जनावरांमुळे नागरिकांच्या जिवीताला धोका निर्माण झालेला आहे. मोकाट जनावरे, मोकाट कुत्री, व मोकाट डुकरे यांचा करमाळा नगरपालिकेने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन ताबडतोब बंदोबस्त करावा शहरातील नागरिक रस्त्यावर असुरक्षित असुन या मोकाट जनावरांनामुळे शाळकरी मुलांमध्येही घबराटीच वातावरण आहे.
