स्वराज्य सरपंच सेवा संघटना महाराष्ट्र राज्य करमाळा तालुका अध्यक्षपदी घारगावच्या आदर्श सरपंच सौ लक्ष्मी संजय सरवदे यांची निवड
करमाळा प्रतिनिधी स्वराज्य सरपंच सेवा संघटना महाराष्ट्र राज्य करमाळा तालुका अध्यक्षपदी घारगावच्या आदर्श सरपंच सौ लक्ष्मी संजय सरवदे यांची निवड करण्यात आली आहे.
“गाव खेड्याचा विकास हाच सरपंच संघटनेचा ध्यास”
ग्रामपंचायत स्तरावरील आपले कार्य बघून जिल्ह्यातील खेड्यांचा विकास होण्याच्या दृष्टीने आपण कामकाज करावे आदर्श सरपंच म्हणून सरपंच संघटनेच्यावतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे
गावांच्या विकासासाठी आपली तळमळ बघून नोंदणी कृत झालेल्या सरपंच सेवा संघाच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी लक्ष्मी सरवदे यांची अधिकृत निवड करण्यात येत आहे.ही निवड दोन वर्षासाठी करण्यात आलेली आहे. असे निवडीचे पत्र संस्थापक सरपंच संघटित चळवळीचे नेते बाबासाहेब पावशे, प्रदेशाध्यक्ष रोहित पवार ,राज्य संपर्कप्रमुख अमोल शेवाळे ,संघटक रवींद्र पवार ,विश्वस्त सुजाता कासार संपर्कप्रमुख अमोल शेवाळे सर्व सन्माननीय यांनी दिले आहे.
