सर्वसामान्य कार्यकर्त्याची बाजू घेतल्यामुळे शासकीय कामात अडथळा आणल्याचा विनाकारण गुन्हा दाखल- शंभूराजे जगताप
करमाळा प्रतिनिधी करमाळा बोरगाव परिसरामध्ये कार्यकर्त्यांनी मोटरसायकलवर पोत्यांनी वाळू नेत असताना पोलिसांनी पकडले वाळू चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करून ते प्रकरण मिटवण्यासाठी पैशाची मागणी केल्यामुळे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे सुपुत्र युवा नेते शंभूराजे जगताप यांनी सदर प्रकरणात मध्यस्थी करून पोलिसांना त्यांची जागा दाखवून पैसे घेताना पोलिसांनी लाच घेतली असल्याचे आरोप केल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यावर व त्यांच्यावर 353 चा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शंभूराजे जगताप यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की माझा कार्यकर्ता घराच्या चौकटीला थोडीशी वाळू नेत असताना पोलिसांनी त्याला वाळू चोरी प्रकरणी पकडले व त्याला पैशाची मागणी केली सदर प्रकरणात आपण मध्यस्थी करून पोलिसांना त्यांचे अधिकार कर्तव्य याची जाणीव करून देऊन त्यांची जागा दाखवल्याने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे माझ्यासारख्या माजी आमदाराच्या मुलावर जर गुन्हा दाखल होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय होतं असेल याचा विचार करणे गरजेचे आहे.गेल्या एक-दीड वर्षापासून करमाळा तालुक्यातील जनतेला पोलिसांकडून कुठल्याही प्रकारची सहकार्य मिळत नाही गुन्हे दाखल करण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वसामान्य नागरिक न्यायापासून वंचित राहत आहे .त्यामुळे आपण या कामी लवकरच सर्व नागरिकांना बरोबर घेऊन आंदोलन करणार असल्याचे शंभूराजे जगताप यांनी सांगितले आहे.
