करमाळा

आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालवण्यासाठी मोठ्या आर्थिक सहकार्याची गरज असून अपेक्षित असा नेतेमंडळीचा सहकार्याचा शब्द न मिळाल्याने निवडणुकीतून माघार -माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी आदिनाथ सहकारी साखर कारखाना हे शेतकऱ्याचे सहकाराचे मंदिर असून सध्याची परिस्थिती पाहता हा कारखाना चालवण्यासाठी मोठ्या आर्थिक सहकार्याची गरज असून नुसतं निवडून येऊन सभासदाला आपण न्याय मिळवून देऊ शकणार नाही त्यामुळे आपण आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमधून माघार घेत असल्याचे मत माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की आदिनाथ सहकारी साखर कारखाना आपल्या ताब्यात असताना आपण शेतकरी सभासदाच्या उसाला योग्य भाव शेतकरी सभासद कामगारांना न्याय दिला परंतु नंतरच्या काळामध्ये गटातटाच्या राजकारणात स्वतःचे अस्तित्व जपण्यासाठी युत्यांचे प्रस्थ वाढल्यामुळे युतीच्या माध्यमातून कारखाना व त्याची निर्णय घेण्यासाठी सर्वांचे एकमत होत नसल्याने युती करून सत्ता मिळवलेल्या कारखान्याला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्व राजकीय मंडळी अपयशी ठरले आहेत. ज्यांना वीस ते पंचवीस वर्ष सत्ता दिली त्यांनाही कारखाना व्यवस्थित चालवता आला नाही कारखान्याच्या माध्यमातून ऊसाला भाव देता आला ना कामगाराला न्याय मिळवून देत आला. अशा परिस्थितीमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये कारखान्यावर दोनशे ते अडीचशे कोटीचे कर्ज असल्याने ते कर्ज फेडण्याबरोबरच कारखाना चालू करण्यासाठी कारखान्याला मोठ्या आर्थिक सहकार्याची गरज आहे आपण आदिनाथ सहकारी साखर कारखान्यासाठी देशाचे नेते नामदार शरद पवार खासदार धैर्यशील माहिते पाटील आमदार रोहित  पवार यांच्याशीही कारखान्याबाबत चर्चा केली .तसेच इतर कुठल्याही मार्गातून कारखाना पुन्हा व्यवस्थित चालवण्यासाठी काही आर्थिक सहकार्य मिळते का याबाबत विचारणा केली तर त्याबाबत मला याबाबत ठोस कुठल्याही प्रकारची आश्वासन न मिळाल्याने आपण आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीतून माघार घेत असून येत्या दोन दिवसांमध्ये जगताप समर्थक सर्व उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत कारण उगाच आपण जनतेसाठी निवडणूक लढवण्यासाठी पुढे होणार यामध्ये कुठल्याही प्रकारचे तत्थ राहिलेले नाही. आमदार नारायण आबा पाटील माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या गटाने निवडणुकीबाबत अद्यापही कुठला निर्णय जाहीर केला नाही. बागल गटाने माघार घेतली आहे त्यामुळे आता राहिलेल्या शिंदे गट पाटील गट यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने आदिनाथ कारखाना चालवण्याची खरी इच्छाशक्ती असेल तर त्यांनी निवडणूक लढवावी त्यांना आपण आदिनाथ  सहकारी साखर कारखाना चालवण्यासाठी नक्की सहकार्य करू परंतु त्यांनी केवळ निवडणुका सत्ता मिळवण्यासाठी शेतकरी कामगार सभासद यांच्या भावनेशी न खेळता राजकारणापुरते राजकारण ठेवून आदिनाथ कारखाना चालवण्यासाठी खऱ्या अर्थाने एकत्र काम करावे.त्यामुळेच आपण आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय जाहीर केला होता परंतु सर्वाना तो पटला नाही.सर्व गटातील नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज भरायला सांगितले.व कधी नव्हे तर‌ २७२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. करमाळा तालुक्यात चार कारखाने असून एकही चालू नाही ही मोठी शोकांतिका आहे. जगताप गटांनी नेहमी सत्याचे निष्ठेचे राजकारण केले असून सत्तेसाठी कुणाच्या भावनेशी न खेळता तत्त्वाचे राजकारण केल्यामुळे विरोधकही जगताप गटाचे नाव घेतात. सध्या तालुक्याचे नेते मंडळींना आदिनाथ सहकारी साखर चालवण्यापेक्षा राजकारण महत्त्वाचे वाटत आहे.आमदार संजयमामा शिंदे यांनी स्वतःचा कारखाना विकला आणि आता शेतकरी सभासद हितासाठी आदिनाथ ची निवडणूक लढवणार आहेत ही चांगली गोष्ट आहे.त्यांना कारखाना चालवण्यासाठी शुभेच्छा आहेतच. आमदार नारायण आबा पाटील यांना कारखान्याच्या चांगला अनुभव आहे.मा . कृषी मंत्री शरद पवार खासदार धैर्यशील माहिते पाटील रणजीतसिंह मोहिते पाटील यांचे सहकार्याने ते कारखाना चालवु शकतात त्यामुळे त्यांना या कार्यात आपण सहकार्य करणार आहोत परंतु सत्तेसाठी निवडणूक न लढविण्याचा आम्ही निर्णय घेतला असून जे कारखाना चालवणार त्यांना गट तट राजकारणाचा विचार न करता सहकार्य करणार असल्याचे मत माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group