मकाईची निवडणुक जिंकणाऱ्यांचे कारखान्याचे भवितव्य घडविण्यासाठी अभिनंदन आणि पराभुत लढणारांचे कौतुक आहे- ॲड. अजित विघ्ने
करमाळा प्रतिनिधी मकाईची निवडणुक जिंकणाऱ्याचे कारखान्याचे भवितव्य घडविण्यासाठी अभिनंदन आणि पराभुत लढणारांचे कौतुक आहे अशी प्रतिक्रिया ॲड. अजित विघ्ने यांनी दिली आहे.
– करमाळा तालुक्यातील मकाई कारखान्याच्या निवडणुकीत बागल गटाचे आठ ऊमेदवार पुर्वीच बिनविरोध निवडून आले असुन उर्वरीत जागासाठी मतदान झाले असुन मतमोजणी चे निकालातुन बागल गटाचे उमदेवार आघाडीवर असल्याचे विजयाकडे वाटचाल कळत आहे. या निवडणुकीत तालुक्यातील प्रमुख विरोधी गटातील नेतेमंडळींनी पाठ फिरवली होती.
