केम येथे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राची आ.रणजितसिंह मोहिते पाटील मा.आ.नारायण(आबा) पाटील यांनी केली पाहणी पंचनामे करण्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या सुचना
केम प्रतिनिधी केम येथे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राची आ.रणजितसिंह मोहिते पाटील मा.आ.नारायण(आबा) पाटील यांनी पहाणी केली. केम परिसरातील उडीद, मका,तुर,कांदा ,ऊस पीकाखालील सुमारे ३५० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.अनेक ठिकानी ओढ्याकाठच्या जमिनी खरवडुन गेल्या आहेत सर्वांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी कोणतेही निकष न ठेवता पंचनामे करण्याचे संबधित अधिकार्यांना आमदार महोदयांनी सुचना केल्या.प्रसंगी गावातील कुंकु कारखानदार,व्यापारी,रेल्वे प्रवासी यांनी विविध समस्या मांडल्या त्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करुन केमच्या सर्वांगीन विकासासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले आहे.
यावेळी मा.जिल्हा परिषदअध्यक्ष अनिरुध्द कांबळे,मा.जि.प.सदस्य दिलीपदादा तळेकर, मा.जि.प,सभापती शिवाजी कांबळे,मा.जि.प सदस्या सवीताराजे भोसले,भारतनाना पाटील,अजित तळेकर, मा.पं,स सभापती शेखर गाडे,सरपंच अकाश भोसले,उपसरपंच नागन्नाथ तळेकर, भाजपा ता. सरचिटणीस अमरजित साळुंके, प्रहार चे ता.अध्यक्ष संदीप तळेकर,रेल्वे प्रवासी संघटनेचे मनोज सोलापुरे,राजेंद्र गोडसे,सुदर्शन तळेकर,मनोज तळेकर,बाळासाहेब बिचितकर,सचिन बिचीतकर,गणेश तळेकर,सागर नागटीळक,धनंजय ताकमोगे,सावंत मामा, विकास काळसाईत, कृषी अधिकारी, सर्कल तलाठी,ग्रामसेवक आदि उपस्थित होते.
