15 ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या ऊस गाळप हंगामाची जोरदार तयारी उजनी बॅकवॉटर परिसरात ऊस तोडणी मजूर दाखल
वाशिंबे प्रतिनिधी:- करमाळा पश्चिम भागातील उजनी बॅकवॉटर परिसरात ऊस तोडणी कामगार दाखल झाले असून 15 ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या ऊस गाळप हंगामाची वाहन मालकाकडून जय्यत तयारी सुरू आहे. हंगामाच्या दृष्टीने कारखान्याचे बॉयलर पेटले आहेत,यंदाही गतवर्षीप्रमाणे ऊस गाळप मोठ्या प्रमाणात होईल. वाहन मालकांकडून वाहने दुरुस्त करणे व इतर कामांची लगबग सुरू आहे. अनेक भागातून ऊस तोडणी मजूर दाखल झाल्यामुळे गावोगावी मजुरांची वर्दळ वाढलेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आठवडा बाजार,बाजारपेठेत गर्दी वाढली आहे.
साखर कारखान्याच्या नियमाप्रमाणे आम्ही ऊस वाहतुकीचा सिझन पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी तयारीत आहोत.
श्री.सुभाष झोळ, वाहनमालक वाशिंबे
