दुबईत साकारले हिंदु मंदिर भारतीयांचे स्वप्न झाले प्रत्यक्षात पूर्ण हिंदू मंदीराचे उद्घघाटन,
करमाळा प्रतिनिधी दुबईत हिंदू मंदीराचे उद्घाटन, ही गोष्ट स्वप्नवत वाटत असली तरी दुबईत हिंदू मंदीराचे उद्घघाटन दुबईतील मंत्र्याच्या हस्ते करण्यात आले आहे. दुबईमध्ये हिंदू मंदिर असावे, हे भारतीयांचे स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण झाले आहे. संयुक्त अरब अमिरातीतील सर्वात जून्या हिंदू प्रार्थनास्थळांपैकी एक असलेल्या ‘सिंधी गुरू दरबार’चे विस्तारीत रुप म्हणजेच हे मंदिर आहे. या मंदीराची फेब्रुवारी २०२० मध्ये पायाभरणी झाली होती.दसरा सणाच्या एक दिवस आधी या मंदीराचे उद्घघाटन झाले आहे. विशेष म्हणजे यु. ए. ई.चे मंत्री शेख नाह्यान बिन मुबारक यांच्या हस्ते या मंदीराचे उद्घघाटन झाले आहे.दुबईतील राजदरबारात सेवा बजावत असलेले आमचे मित्र मुळचे सोलापूर येथील रहिवासी मतीन शेख यांनी मंदिराचे हे फोटो शेअर केले आहेत.
