करमाळा

पारेवाडी येथील सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांचा आमदार संजयमामा शिंदे गटात जाहीर प्रवेश


करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील महत्त्वाचे असलेल्या पारेवाडी गावातील सरपंच श्री पांडुरंग नवले यांचेसह ग्रामपंचायत सदस्य यांनी दिनांक 17 सप्टेंबर रोजी आमदार संजयमामा शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यामुळे पश्चिम भागामध्ये आमदार संजयमामा शिंदे यांची ताकद अधिक वाढली आहे. यापूर्वीच पश्चिम भागातील केतुर येथील अँड अजित विघ्ने,शेटफळ (ना) येथील सरपंच पांडुरंग लबडे, उपसरपंच शिवाजी पोळ यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी यापूर्वीच शिंदे गटात प्रवेश केलेला असून दिवेगव्हण येथील कार्यकर्तेही प्रवेश करण्याच्या तयारीमध्ये आहेत. करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये आमदार संजयमामा शिंदे यांचे साठी ही मोठी जमेची बाजू आहे.
पारेवाडी येथील श्री सुधाकर पाटील ,सरपंच पंडुरंग नवले , ग्रा.पंचायत सदस्य बापू मोरे ,संतोष शिंदे, गणेश खोटे, नामदेव सोनवणे,रमेश खोटे,केशव खोटे,बंडू (तात्या) नवले,जालिंदर नवले ,दत्ता नवले,नाना साहेब घाडगे,शिवलिंग मोहिते,नितीन शिंदे,शिवाजी डरंगे,सोसायटी सदस्य लक्ष्मण खोटे,राजू जाधव,सोन्या पाटील,प्रमोद पाटील,विशाल पाटील ,उमेश पाटील ,शरद जाधव,नितीन मोरे यांनी प्रवेश केला. याप्रसंगी श्री पैलवान मंगेश खोटे ,नामदेव गुंडगिरे , गणेश गुंडगिरे , दत्तू गुंडगिरे, नवनाथ चव्हाण, सुजित तात्या बागल, सुरज ढेरे आदी उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group