Wednesday, April 8, 2026
करमाळा

प.पु. श्रुती मुनीजी म.सा. यांच्या प्रेरनेने सुरु झालेल्या गुरु गणेश दिव्यरत्न गो पालन संस्था करमाळा येथे बैलपोळा मोठ्या उत्साहात आनंदात साजरा

करमाळा प्रतिनिधी  बैल पोळा हा सण सध्या अहिल्यानगर येथे धार्मिक परीक्षा बोर्डावार चातुर्मास असलेले प.पु. श्रुती मुनीजी म.सा. यांच्या प्रेरनेने सुरु झालेल्या गुरु गणेश दिव्यरत्न गो पालन संस्था करमाळा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गोपालन संस्थेत सध्या 90 गोमातेची सेवा केली जाते. या वेळेस गो -सेवा समिती चे सदस्य तसेच प्रमुख अतिथी च्या उपस्थितीत गो – मातेची पूजा करण्यात आली .त्या नंतर पोळ्यांच्या स्नेह भोजनाचा आस्वाद सर्व उपस्थितानी घेतला.
या वेळेस गो पालन संस्थेचे अध्यक्ष श्रेणिक खाटेर यांनी गो मातेचे महत्व सांगून गाई ची पूजा करण्यात आली. या वेळेस माजी उपनगराध्यक्ष कमलाकरजी वीर यांनी श्रेणिक खाटेर व गो सेवा समिती चे सर्व सदस्य यांच्या कार्याचे कौतुक करून भावी सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी जैन संघांचे अध्यक्ष रमेश जी कटारिया, पिंटूशेठ गुगळे , बाळासाहेब वांगडे , प्रकाश मुनोत , नलवडे साहेब, अमृतजी कटारिया , नितीन दोशी , प्रीतम दोशी , वैभव दोशी , विनोद पडवळे , आदेश ललवाणी , सतीश बालदोटा, केतन संचेती, गणेश बोरा , अक्षय मांडलेचा , दिनेश मुथा, जीवन संचेती , अभय शिंगची संकेत खाटेर, वर्धमान खाटेर, संगीता खाटेर , मोक्षा खाटेर, पोपटराव काळदाते, चंद्रकांत काळदाते, अमोल महाराज काळदाते , विजय बरिदे, गिरीश शहा यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.शेवटी सर्वांचे आभार वर्धमान खाटेर यांनी मांडले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!