Thursday, April 17, 2025
Latest:
करमाळाराजकीय

करमाळा तालुका राष्ट्रवादीच्यावतीने अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन

करमाळा प्रतिनिधी
राष्ट्रवादीच्या नेत्या संसद रत्न आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्यावरती खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या शिंदे गटाचे कृषी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ करमाळा येथे करमाळा तालुका राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात आले हे आंदोलन आज सायंकाळी सहा वाजल्यापासून करमाळा येथील सुभाष चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले, यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत अब्दुल सत्तार यांच्या वायफळ वक्तव्याचा निषेध केला नेहमीच महिलांबद्दल अपमान जनक वक्तव्य करणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्या विरोधात करमाळ्यातील सुभाष चौक येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली व जाहीर निषेध करत मुख्यमंत्र्यांनी त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा ही मागणी केली यावेळी करमाळा तालुका राष्ट्रवादीचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष श्री संतोष वारे जिल्हा उपाध्यक्ष अभिषेक आव्हाड, राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष नलिनी जाधव, राष्ट्रवादी युवती तालुकाध्यक्ष शितल क्षिरसागर, कु स्नेहल अवचर, लुंगारे ताई ,राजश्री कांबळे सौ.विजयमाला चवरे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी सचिन नलवडे तेजस ढेरे ,रविराज घाडगे सागर कुराडे, ऋषिकेश शिगची ,आशपाक जमादार ,विजयसिंहओहोळ, प्रशांत सुरवसे ,संजय सुरवसे, सचिन तळेकर जमीर पठाण,, सतीश शिंदे शिवम घाडगे, नितीन माने अर्शन पठाण ,सलीम सय्यद शिवाजी जाधव, रामेश्वर भरते ,अरबाज सय्यद ,यांच्यासह शेकडं राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते,

,

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group