कोरोनातून बोध घेऊन वांगीतील जि.प शाळेतील शिक्षकांनी तयार केला आरोग्यवर्धक ऑक्सीजन पार्क
वांगी प्रतिनिधी कोरोना महामारीचा सर्व जगाला फटका बसला. ऑक्सीजनची किंमत सर्वांना कळली पण तोपर्यंत वेळ गेलेली होती. म्हणून आम्ही असा विचार केला की आपण शाळेत ऑक्सीजन निर्मिती करणारी वनस्पतीची लागवड करावी. आणि ते शक्य झाले ग्रामस्थाच्या सहकार्याने. ही कहाणी आहे जि.प. प्राथमिक शाळा वांगी नं 4 येथील मुख्याध्यापक भारत भानवसे सहकारी शिक्षक राजाराम भिसे
यांच्या व ग्रामस्थाच्या सहकार्याने ॲाक्सिजन पार्कची निर्मिती करण्याचे ठरवुन ऑक्सीजन पार्कसाठी शाळेत 3 गुंठा क्षेत्रात हवा शुद्ध करणारी व जास्त ऑक्सीजन देणारी तुळस या वनस्पतीची लागवड केली. तुळशीच्या झाडापासून भरपूर ऑक्सीजन मिळत असल्याने गावातील वृद्ध,तरुण,पुरुष व महिला या सायंकाळी ऑक्सीजन पार्कमधे येतात, बसतात.बसण्यासाठी बाकाची सोय केली आहे. या पार्कसाठी श्री.लक्ष्मण वाघमारे यांनी तारेचे कुंपण करून दिले असून सर्व तूळशींना ठिबक सिंचनाने पाणीपुरवठा केला जातो. एखादी गोष्ट करायची ठरवली की,ती पूर्ण करायची हा उद्देश डोळ्यासमोर ठेउन केलेली ही बाग आदर्शवत वाटत आहे.
