अमोल जाधव यांना ‘युवा भिम सेना’चा उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार
करमाळा, प्रतिनिधी – राज्यभर व्याप्ती असलेल्या युवा भिम सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार यावर्षी करमाळा शहरातील युवा सामाजिक कार्यकर्ते काँग्रेस इंटक सोलापूर जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांना देण्यात आला आहे. रविवार दिनांक ०५ रोजी दुपारी २.०० वा. सोलापूर येथील समाज कल्याण केंद्र (रंगभवन चौक) येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात जाधव यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.अमोल जाधव यांचे करमाळा शहर व तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमात नेहमीच सहभाग असतो. त्यांच्या या कार्याची दखल घेत युवा भिम सेना या सामाजिक संघटनेने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली. शुक्रवारी सोलापूर येथील समाज कल्याण केंद्र येथे या संघटनेचा ७ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात राज्यभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.अमोल जाधव यांना उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल युवा भिम सेनेचे संस्थापक अध्यक्ष महेश (आण्णा) डोलारे यांनी अभिनंदन केले असून करमाळा शहर व तालुक्यातूनही जाधव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.