डाॅ अब्दुल कलाम आझाद फौंऊडेशनच्यावतीने कै. सय्यदभाई पत्रकार यांच्या स्मरणार्थ उर्दु शाळेस फळा भेट
करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील डाॅ अब्दुल कलाम आझाद फौंडेश च्यावतीने पै कासम सय्यद पत्रकार यांच्या स्मरणार्थ कै. नामदेवराव जगताप ऊर्दु प्राथमिक शाळेस नगरसेवक संजय सावंत यांचे शुभ हस्ते फळा भेट देण्यात आला. यावेळी करमाळा अर्बन बॅकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार हाजी फारुक बेग, जामामस्जिदचे विश्वस्त जमीर सय्यद, डाॅ अब्दुल कलाम आझाद फौंडेशन चे संस्थापक समीर शेख़,रईस एजन्सीजचे मालक अल्लाऊदीन शेख, समीर बागवान, अकबर बेग, राजु बेग ,अज्जु सय्यद रमजान बेग आदी जण उपस्थित होते
यावेळी बोलताना नगरसेवक संजय सावंत म्हणाले की डाॅ अब्दुल कलाम आझाद फौंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातुन आजपर्यंत अनेक सामाजिक कार्यक्रम राबविण्यात आले असुन उर्दु प्राथमिक शाळेस फळयाची गरज होती ती अब्दुल कलाम आझाद फौंडेशन ने आज पुर्ण केली पुढील काळात ही असेच सामाजिक उपक्रम राबवुन अशीच समाजसेवा करावी असे ते यावेळी म्हणाले
याच प्रमाणे अब्दुल कलाम आझाद फौंडेशन च्या वतीने किल्ला वेस येथे अंगणवाड़ी क्रमांक चार येथे फळा भेट देण्यात आला व लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी अंगणवाडी शिक्षीका कदीरा बेग, मुख्याध्यापक शिंदे, जोशी मॅडम उबाळे मॅडम उपस्थित होते.यावेळी कै नामदेवराव जगताप उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जुबेर जनवाडकर यांनी आभार मानले.
