कुंभेज येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०२ वी. जयंती उत्साहात साजरी
करमाळा प्रतिनिधी
कुंभेज येथे मातंग अस्मिता संघर्ष सेनेच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०२वी जयंती उत्साहात साजरा करण्यात आली, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुंभेज गावच्या सरपंच सौ सिंधुताई गायकवाड या होत्या तर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन प्रमुख पाहुणे जेऊर पोलीस स्टेशनचे मा. मनोज खंडागळे साहेब , अजय कामटे, व महावितरण विभागाचे गणेश चोरघडे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले, यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची करमाळा तालुका सर्व पदाधिकारी उपस्थित होते, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. बाळासाहेब भिसे यांनी केले, यावेळी उपस्थित मान्यवर व्यक्तींनी आपले मनोगत व्यक्त केले,यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या जिल्हा महिला अध्यक्षा तसेच मातंग अस्मिता संघर्ष सेना तालुका अध्यक्षा सौ. आशाताई चांदणे,यांनी आपल्या मनोगतातुन समाजासाठी असलेली तळमळ व्यक्त केली, समाज हा एकोप्याने राहीला पाहीजे,तरच कुठलाही समाज सुधारल्याशिवाय राहणार नाही असे बोलुन आलेल्या सर्व अधिकारी,पदाधिकारी व उपस्थिती सर्वांचे आभार व्यक्त केले,यानंतर प्रमिला जाधव यांनी आपल्या मनोगतातुन व्यक्त केले की, समाजात वावरताना विचार, आणि,कार्ये चांगले पाहिजे तरच समाजात अनेक बदल घडून येतिल असे सांगितले, यानंतर संभाजी शिंदे, बाळासाहेब भिसे, रेश्मा सरोदे यांनी मनोगत व्यक्त केले,
यावेळी उपस्थित, कुंभेजचे ग्रामपंचायत सदस्य मा. गुरुदास सुर्वे, वि. सोसायटी चेअरमन मा. नितिन भोसले, महावितरण विभागाचे अमोल उघडे, रमेश पोळ, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जेऊर शहर अध्यक्ष मा. आबासाहेब झिंजाडे,तालुका संपर्क प्रमुख प्रमोद खराडे, सदस्य माधुरीताई कुंभार, श्रीमंत दिवटे, प्रगतशील बागायतदार रामभाऊ मोरतळे, आर, पी, आय, अध्यक्ष दिलिप पवळ, संजय चांदणे, हे होते. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदणे वस्ती मुख्याध्यापक सोहणी सर, कुंभेजचे ग्रामसेवक पाटील भाऊसाहेब याचे सहकार्य लाभले,
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन नवले यांनी केले, तर आभार श्रीमंत दिवटे यांनी मानले, या कार्यक्रमासाठी अधिक परिश्रम घेतलेले मातंग अस्मिता संघर्ष सेनेचे युवा नेते, संतोष चांदणे, सुभाष चांदणे, महेश चांदणे, प्रेमराज चांदणे, बापू चांदणे, प्पपु चांदणे, आप्पा आडसुळ, रोहन चांदणे, नाना, अस्वले, रोहित चांदणे, रोहन चांदणे, हर्षद चांदणे, प्रविण ढावरे, यशवंत पाटोळे, रोहन चांदणे, आर्यन चांदणे, यां सर्वांनी सहभाग घेऊन कार्यक्रम चागल्या प्रकारे पार पडला.
