घारगाव चे सुपुत्र श्री संजय सरवदे यांना शेतकरी पुत्र फाउंडेशन अहमदनगर महाराष्ट्र यांचेकडून नॅशनल ग्रेट अचीवर्स अवार्ड 2022 या पुरस्काराने करणार सन्मानित
घारगाव प्रतिनिधी सामाजिक कार्याची दखल घेऊन करमाळा तालुक्यातील घारगाव चे सुपुत्र श्री संजय सरवदे यांना शेतकरी पुत्र फाउंडेशन अहमदनगर महाराष्ट्र यांचेकडून नॅशनल ग्रेट अचीवर्स अवार्ड 2022 या पुरस्काराने करणार सन्मानित करण्यात येणार आहे.
शेतकरी पुत्र फाउंडेशनने यावर्षी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्यामध्ये कृषी, उद्योजक, शैक्षणिक, सामाजिक व इतर क्षेत्रातील मान्यवरांना नॅशनल ग्रेट अचिवर्स अवॉर्ड 2022 पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे आपण ही गेल्या अनेक वर्षभरापासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहे. आपण केलेले कार्य हे आम्हाला प्रेरणा व ऊर्जा देणारे आहे. आम्हाला कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, आपण आपल्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी शेतकरी पुत्र फाउंडेशन आयोजित ग्रेटअचिवर्स अवॉर्ड 2022 हा आहे.
असे सन्मानमूर्ती निवड पत्र देऊन शेतकरी पुत्र फाउंडेशन अहमदनगर महाराष्ट्र संस्थापक, अध्यक्ष अनिकेत अशोक शेळके यांनी कळविले आहे .
