रेग्युलर कर्ज भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना ५०,०००/- हजार रुपयांचा लाभ कधी मिळणार- ॲड. अजित विघ्ने
करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाची महात्मा फुले कर्ज मुक्ती योजनेतुन राज्यातील सर्व रेग्युलर कर्ज भरणा करणाऱ्या शेतकर्यांना प्रत्येकी, ५००००/- रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा झाली.. त्यानुसार दिवाळीपूर्वी काही शेतकरी बांधवाना त्याचा लाभ मिळाता आहे, परंतु उर्वरीत शेतकर्यांना लाभ कधी मिळणार?.. छत्रपति सन्मान योजनेतुनही काही शेतकरी वंचित राहीले होते, याबाबत औरंगबाद खंडपिठाने अतिशय महत्वपूर्ण निर्णय दिलेला असुन, या योजनेतुन वंचित राहीलेल्या शेतकयांना तातडीने लाभ देण्याचे निर्देश दिलेले आहेत.. शिंदे- फडणविस सरकारनेही रेग्युलर कर्ज भरणा करणारे शेतकऱ्यासाठी प्रत्येकी५००००/- रुपये देण्याची घोषणा केली यापैकी प्राथमिक काही शेतकर्यांची यादी आली व पैसेही मिळाले परंतु अद्यापही अनेक शेतकरी या योजने पासुन वंचित आहेत, तरी त्यांना कधी लाभ देणार ?.. यापासुन एकही रेग्युलर शेतकरी वंचित राहु नये.. सदरची यादी तातडीने प्रसिध्द करुन सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ द्यावा अशी मागणी अॅड. अजितराव विघ्ने यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
