करमाळा तालुक्यातील बागल गटाचा विजयी झंडा कायम; 30 पैकी 11 ग्रामपंचायतींवर बाजी मारली असल्याचा दावा
करमाळा प्रतिनिधी/ करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत बागल गटाने बाजी मारली असून 30 ग्रामपंचायती पैकी तब्बल 11 ग्रामपंचायतीवर बागल गटाने विजय संपादन केला आहे. या विजयामुळे करमाळा तालुक्यातील माजी राज्यमंत्री स्व. दिगंबरावजी बागल गट अध्यापही भक्कम असल्याचे बागल गटाकडून सांगण्यात आले व आहे.
एकूण झालेल्या निवडणूकी मध्ये 11 जागेवर बागल गटाने खालिल ग्रामपंचायतीवर विजय मिळवीला असल्याचा दावा केला आहे.
– दिव्हेगव्हान, मांजरगाव, कोंढारचिंचोली, दिव्हेगव्हान, रिटेवाडी मोरवड, तरडगाव, हींगणी, कुंभांरगाव, वंजारवाडी, लिंबेवाडी.
या अकरा ग्रामपंचायतींवर आपला विजयी झंडा फडकावत बागल गटाने आपले तालुक्यातील वर्चस्व कायम ठेवले असल्याचे सांगितले आहे. यावेळी विजयी उमेदवार व बागल गटाच्या कार्यकर्त्यांनी करमाळा तालुक्याचे युवा नेते व मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री.दिग्वीजय भैय्या बागल यांच्या निवासस्थानी गुलाल उधळत व फटाक्यांची आतीषबाजी करत आनंद व्यक्त केला आहेे.
