आळजापूर शाळेचा सायकल बँक उपक्रम पाचवी ते सातवीतील मुलींसाठी सायकलींचे वाटप
करमाळा प्रतिनिधी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतील सायकल बँक उपक्रम तालुक्यातील आळजापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राबविला गेला आहे. यावेळी वाडी- वस्तीवरून पायी चालत शाळेत येणाऱ्या पाचवी ते सातवीतील सोळा मुलींसाठी लोकसहभागातून सायकलींचे वाटप करण्यात आले.
सदर सायकलींसाठी जिल्हा परिषद सदस्या राणीताई वारे, अशोका फाऊंडेशनचे राजेंद्र रोडे, डॉ. गौतम रोडे, सुरेश गपाट, दत्तात्रय टेंबाळे, रघुनाथ रोडे, युवराज गपाट, दादासाहेब रोडे, दादासाहेब नवले, चेतन किंगर, अभिमन्यू काळे, मुख्याध्यापक लहू चव्हाण यांनी मिळून सत्तर हजार चारशे रुपयांची देणगी देवून सहकार्य केले.
शाळेत पार पडलेल्या सायकल वाटप समारंभास गटविकास अधिकारी मनोज राऊत, गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी जयवंत नलवडे व मनसेचे तालुका प्रमुख संजय घोलप,पोलिस पाटील विश्वंभर रोडे, ग्रामसेवक निकम, रविकांत घोडके, दत्तात्रय घोडके, पार्वती रोडे, कैलास रोडे, महादेव गायकवाड, सुरेश गपाट, दत्तात्रय टेंबाळे, विनोद नवले, विलास गायकवाड, लक्ष्मण वाघमोडे, दादासाहेब रोडे, नाथा काळे, मच्छिंद्र रोडे, युवराज गपाट, दस्तगीर शेख, भरत रोडे, दिगंबर रोडे, अभिमन्यू काळे आणि शिक्षणप्रेमी पालक उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना गटविकास अधिकारी राऊत यांनी, शाळेत मुलींच्या शिक्षणासाठी राबविला जाणारा सायकल बँक हा उपक्रम कौतुकास्पद आहे. प्राथमिक शाळा या ग्रामीण भागातील मुलांचे भविष्य घडवितात. याचा विचार करुन ग्रामस्थांनी शाळा आणि विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी सहकार्य करण्याची भूमिका ठेवली पाहिजे. असे सांगितले. तर गटशिक्षणाधिकारी पाटील यांनी मुलींच्या शिक्षणासाठी सायकल बँकेस सहकार्य म्हणून देणगी देणाऱ्या ग्रामस्थांची भूमिका कौतुकास्पद असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी दिवंगत सद्दाम शेख यांच्या स्मरणार्थ सद्दाम शेख मित्र मंडळाकडून शाळेस भेट देण्यात आलेला ताशी साठ लीटर क्षमतेचा वॉटर फिल्टर तसेच ग्रामपंचायतच्या वतीने पंधराव्या वित्त आयोगातून शाळेस दिलेल्या स्मार्ट टीव्ही स्क्रीनचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक लहू चव्हाण, सहशिक्षिका वर्षा सानप, विद्या निगुडे, वैशाली गुंजाळ आदींनी परिश्रम घेतले.
-्
