करमाळासहकार

आदिनाथ साखर कारखाना चालु होण्यासाठी सर्वाच्या सहकार्याची वाट बघतोय पुढाऱ्यांनो बोलण्यापेक्षा कारखाना चालु करा राजकीय इच्छाशक्ती काळाची गरज

आदिनाथ साखर कारखाना चालु होण्यासाठी सर्वाच्या सहकार्याची वाट बघतोय पुढाऱ्यांनो बोलण्यापेक्षा कारखाना चालु करा राजकीय इच्छाशक्तीची काळाची गरज  आहे.करमाळा तालुक्यातील शेतकऱ्याच्या जीवनाला वरदान ठरलेला आदिनाथ कारखाना सध्या सुरू होण्याची वाट बघत आहे. आदिनाथ कारखाना चालू झाल्यापासून करमाळा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे जीवनमान बदलले अनेकांना समृद्धीचे जीवन देणारा आदिनाथ कारखाना चालू होण्याच्या प्रगतीपथावर आहे करमाळा तालुक्याचे राजकारण आदिनाथ कारखान्यावरच अवलंबून असून सध्या हाच कारखाना चालू करण्यासाठी बागल गट पाटील गट विद्यमान संचालक मंडळ तो मार्गदर्शक हरिदास डांगे साहेब हे प्रयत्न करत आहेत आजिनाथ कारखाना चालला पाहिजे शेतकऱ्याच्या उसाचा अतिरिक्त प्रश्न सोडवण्यासाठी आदिनाथ कारखाना हा एकमेव पर्याय असून शेतकऱ्यांनी नंतर ऊस घालण्यासाठी इतर कारखान्याच्या हाता पाया पडून टोळीसाठी पैसे देण्यापेक्षा आपल्या हक्काचा असलेला आदिनाथ कारखान्याला जर पाच दहा हजाराची मदत केली तर हा कारखाना स्वाभिमानाने चालू होऊन शेतकऱ्याची सभासदाची व कामगाराची जीवनमान बदलू शकतो याचा विचार आदिनाथ कारखान्याचा 30000 सभासदांनी केल्यास हा कारखाना पुन्हा जोमाने सुरू होऊन आपल्या जीवनात समृद्धी आणणार आहे विचार करा सर्वांनी आता बोलण्यापेक्षा कारखाना चालू करण्याकडे आपली कृती पूर्ण मदत करून आदिनाथ कारखान्याला गत वैभव मिळवून देण्यासाठी काम करावे आदिनाथ महाराज कृपा आपल्यावर नक्की होईल त्यामुळे आता राजकारण करण्यापेक्षा आपल्या हक्काचा चालू हक्काचा कारखाना चालू करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्या हीच अपेक्षा.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group