पुढाऱ्यांना गायरान जमिनीवरील बेकायदेशीर अतिक्रमण काढण्यास भाग पाडावे नाही अन्यथा 26 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यामध्ये गायरान जमिनीवर पुढार्यांनी अतिक्रमण केलेले आहे तर अतिक्रमण काढण्यात यावे अन्यथा सोलापुर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 26 जानेवारीला उपोषण करणार असल्याचे निलज येथील सामाजिक कार्यकर्त अशोक वाघमोडे यांनी सांगितले आहे.त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की आपण सामाजिक कार्यकर्ता असून गेल्या 25 ते 30 वर्षापासून सामाजिक काम करत आहे तरी करमाळा तालुक्यामध्ये पोथरे निलज येथील रहिवाशी असुन करमाळा तालुक्यामध्ये मस्तवाल पुढार्यांनी शासनाचे गायरान जमीन बेकायदेशीर रित्या हडप करून त्या ठिकाणी ऊस फळबागाची लागण केलेली आहे आणि त्या गायरान जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण करून मोठमोठे बंगले बांधलेले आहेत पुढाऱ्यांनी स्वतःच्या राजकीय दबाव यंत्राचा वापर करून गोरगरीब जनतेला व प्रशासनाला वेटीस धरून गायरान जमिनीवर बेकायदेशीर अतिक्र केलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच गाव पातळीवर असलेल्या गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचे आदेश दिलेली आहेत. अतिक्रमण धारकांची यादी गावच्या चावडीवर लावण्यात येणार आहे. त्यांना दहा दिवसाचे मुदत दिलेली आहे. अतिक्रमण काढून घेतल्यास शासकीय यंत्रणा द्वारे कारवाई केली जाईल त्यासाठी होणारा खर्च जमीन महसूल ची थकबाकी म्हणून संबंधितांकडून वसूल करण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे.
प्रत्यक्ष गावात गायरान जमिनीमुळे खूप वात तंटे वाढले आहेत तरी प्रत्येक गावातील गोरगरीब मूलमजूर शेतकरी यांच्या शेळ्या व मेंढ्या व पाळीव प्राणी गाव व वन्य प्राण्यांना चारायचे कुरणे करण्यासाठी शासनाने त्वरित शासकीय गायरान जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रम हटावे आणि गोरगरीब जनतेने अतिक्रमण केलेले नाही पु.अतिक्रमण केलेले आहे अशा पुढाऱ्यांना गायरान जमिनीवरील बेकायदेशीर अतिक्रमण काढण्यास भाग पाडावे तसे नाही झाल्यात आम्ही लोकशाही मार्गाने 26 जानेवारी 2023 रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असुन होणाऱ्या परिणामा शासन प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असे म्हटले आहे.
