ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळामध्ये माँ साहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
करमाळा प्रतिनिधी स्वराज्य जननी जिजामाता व थोर युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती त्यानिमित्त ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट मध्ये सर्व विद्यार्थी शिक्षक यांच्या उपस्थित मध्ये आनंदात साजरी करण्यात आली यावेळी वेगवेगळ्या मुलींनी जिजाऊ माँ साहेब यांची वेशभूषा करून सर्वांना आकर्षित केले त्यामधूनच ज्ञान प्रबोधन केले यामध्ये विशाखा थिटे,दिक्षा काळे , ज्ञानेश्वरी खताळ, दीप्ती गुळवे,तनया लबडे,ज्ञानेश्वरी मोरे,या सर्वांनी मॉ साहेब जिजाऊची प्रमुख भूमिका साकारली होती. तसेच काही विद्यार्थ्यांनी भाषणे करून माँ साहेब जिजाऊ चा कार्याचा गौरव केला.तसेच शिक्षकामधून संचालिका अश्विनी निकत मॅडम व विवेक कांबळे सर , निलेश जाधवर,यांनी आपल्या मनोगतातून माँ साहेब जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची छान ओळख करून दिली.त्याच बरोबर इन्स्टिट्यूट चे संस्थापक महेश निकत सर यांनी ही मासाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांनी नी केलेल्या कष्टाची ओळख करून दिली.तसेच सर्वांनी खूप छान नियोजन केल्यामुळे सर्वांचे आभार मानले.
