Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

समाधान काळे यांचा भाजपप्रवेश हे वृत्त चुकीचे एन एस यु आयचा माझा संबध नसुन भाजपमध्ये माझा प्रवेश वैयक्तिक-समाधान काळे

* करमाळा प्रतिनिधी एन एस यु आय तालुकाध्यक्ष समाधान राजेंद्र काळे यांनी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला अशा प्रकारचे वृत्त बातम्यांमध्ये देण्यात आले होते सदरची वृत्त खरे नसून समाधान राजेंद्र काळे यांनी याबाबत लेखी पत्र देऊन याबाबत खुलासा केला आहे की एन एस एन एस यु आय संघटनेचा आपला कसलाही संबंध नसून तालुकाध्यक्ष पदाचे कुठलेही निवडीचे पत्र आपणाकडून नसून एक वर्षापासून काँग्रेसमध्ये काम करत असल्याचे त्यांनी पत्रामध्ये असे नमूद केले आहे की वास्तविक पहाता मी गत १ वर्षापासुन काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणुन काम करत होतो.मला आजपर्यत N.S.U.I. चे करमाळा तालुकाध्यक्षपदी निवड केली असल्याचे कोणतेही पत्र मिळाले नसुन प्रसिध्द झालेली बातमी चुकीची आहे. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा दौरा मौजे विहाळ या ठिकाणी दौरा होता.सदर दौऱ्यामध्ये वैयक्तिकरित्या गेलो असता मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता इतकीच ओळख माझी होती.परंतु मी वैयक्तिकरित्या भा.ज.पा.पक्षात प्रवेश केला असुन प्रवेश करत असताना N,S.U.I. संघटनेचे कोणतेच पद अधिकृतरित्या माझ्याकडे नव्हते.आजचा प्रवेश हा माझा वैयक्तिक असल्याचे समाधान काळे यांनी पत्राद्वारे सांगितले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group