दत्तकला आयडियल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ची 100%निकालाची परंपरा कायम
करमाळा प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील दत्तकला शिक्षण संस्थेचे दत्तकला आयडियल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज केत्तुर नं.1 च्या ज्युनिअर कॉलेज च्या विज्ञान विभागाचा इयत्ता बारावीचा निकाल सलग आठव्या वर्षीही 100 % लागला असून विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले आहे.ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे विद्यालय असा दबदबा कायम ठेवला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे विद्यालय वरदानच ठरले आहे.परिसरातील विद्यार्थ्यांना विशेषत: मुलींना जवळच शिक्षणाची सोय झाल्याने पालकांमधे आनंदाचे वातावरण आहे. विद्यालयातील शिक्षक योग्य मार्गदर्शन करित असल्याने कोणत्याही खाजगी शिकवणी विना विद्यार्थ्यांनी खूप छान यश संपादन केले आहे.
*विज्ञान विभागामध्ये प्रथम क्रमांक*
1) *श्रेयश हारी शिंदे* .82.83%
*द्वितीय क्रमांक*
2) *शिवम अभिमान गोरे.* 80.33%
*तृतीय क्रमांक*
3) *स्नेहल शिवाजी सरवदे* .78.83%
या विद्यार्थ्यांनी पटकावले.
तसेच विद्यालयातील बारावीच्या 39 विद्यार्थ्यांपैकी 21 विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत, 13 विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि 3 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळवली आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर संस्थेचे उपाध्यक्ष श्री. राणा दादा सुर्यवंशी साहेब सचिवा प्रा.माया झोळ मॅडम स्कूल डायरेक्टर प्रा. नंदा ताटे मॅडम प्राचार्य विजय मारकड सर व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
