करमाळासकारात्मक

शिवकालीन वाद्यवृंद व वातावरण निर्मिती द्वारे *दत्तकलामध्ये शिवजयंती सोहळा जल्लोषात साजरा

करमाळा प्रतिनिधी: स्वामी-चिंचोली (भिगवण) येथील दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती सोहळा अतिशय उत्साह व जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. *महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील* या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते.

संस्थेचे उपाध्यक्ष श्री. राणादादा सूर्यवंशी साहेब यांच्या संकल्पनेतून शिवकालीन वातावरण निर्मिती द्वारे शिवजयंती साजरी करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी शिवकालीन पोशाखाचा पेहराव केलेला होता तसेच त्यांच्याद्वारे विशेष बोलविण्यात आलेल्या शिवकालीन मर्दानी खेळ पथक, ढोल ताशा पथक, झांज पथक, हालगी पथक, लेझीम पथक, अश्व पथक, तुतारी पथक इ. शिवकालीन वाद्यांनी व खेळांनी संपूर्ण वातावरण शिवकालीन करून टाकले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे उपाध्यक्ष श्री. राणादादा सुर्यवंशी साहेब यांनी भूषविले तसेच सदर कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, सचिव प्रा. सौ. माया झोळ, दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. भाऊसाहेब पाटील, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व प्रतिष्ठित व आमंत्रित मान्यवर तसेच संस्थेच्या सर्व महाविद्यालयातील संचालक, प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्थेतील जवळपास ५००० विद्यार्थी उपस्थित होते.
सोहळ्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पालखीतून भव्य व दिव्य अशी सवाद्य मिरवणूक मोठ्या दिमाखात पार पडली त्यानंतर महाविद्यालयाच्या इमारतीच्या भिंतीवर भल्या मोठ्या छायाचित्राचे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत व साद सूराच्या साक्षीने अनावरण करण्यात आले. अंगावर शहारे उभारतील अशा रोमांचकारी शिवगर्जनेद्वारे पुढील कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रा. रामदास झोळ यांनी त्यांच्या मनोगत्वाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचे एक आदर्श विद्यार्थी म्हणून असलेले रूप अधोरेखित केले तसेच पुणे विद्यापीठात एम.एस्सी अभ्यासक्रमास सोबत शिकत असतानाच्या त्यांच्या व श्री बानगुडे पाटील यांच्या आठवणींना उजळा दिला.प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी त्यांच्या शिवव्याख्यानाद्वारे शिवाजी महाराजांच्या अंगी असलेल्या अनेक सुप्त गुणांच्या पैलूंचे सखोल विश्लेषण केले. महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, आंध्र प्रदेश तसेच सबंध भारताने अनुभवलेल्या शिवाजी महाराजांच्या विविध कारनाम्यांचे ज्ञान व काही विशेष किस्से बानगुडे पाटलांनी त्यांच्या अमोघ वक्तृत्वाद्वारे उपस्थितांना करून दिले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर जगताप यांनी केले, कार्यक्रम प्रमुख संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर यांनी व समन्वयक म्हणून प्राचार्य डॉ. सुनील हरेर यांनी काम पाहिले, आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्रा. श्रीकांत साळुंखे यांनी केले.संपूर्ण मिरवणूक व कार्यक्रम सर्व विद्यार्थ्यांनी निर्विघ्नपणे, उत्कृष्टपणे पार पाडल्याबद्दल सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमासाठी केलेल्या अथक परिश्रमाबद्दल संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना शाबासकीची थाप दिली.

error: Don\'t try to copy. Content is protected !!