करमाळा

करमाळा तालुक्यातील भांडवलकर शिंदे कुटुंबाने साखरपुड्यात विवाह करून पूजा अनिलची बांधली सात जन्माची लगीनगाठ

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील मौजे वडगाव दक्षिण येथील श्री लक्ष्मण भागवत भांडवलकर यांची कन्या पुजा व बोरगाव येथील श्री विठ्ठल किसन शिंदे यांचे सुपुत्र पुणे येथे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणारे उद्योजक अनिल शिंदे यांचा साखर पुढा दिनांक 13/3/2022 रोजी निश्चित झाला होता कार्यक्रमाची सुरुवात झाली होती परंतु त्या क्षणी दोन्हीकडील जेष्ठ नागरिक यांनी वधू वरांच्या आई वडील यांच्याशी चर्चा करुन आपण साखर पुढ्यात विवाह करावा असे विचार मांडले व लगेच दोन्ही वधु व वरांच्या आई आणि वडिलांनी विचार करुन निर्णय घेतला.साखरपुडयात विवाह सपंन झाला. या विवाह सोहळ्याला गटाचे नेते सुनील बापू सावंत नगरसेवक महादेव अण्णा फंड अतुल फंड वडगाव दक्षिणचे सरपंच भाऊसाहेब काळे उपस्थित होते . हा विवाह सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री चंदु मुसळे अरबाज बेग उत्तम घाडगे आप्पा भोगल बाळासाहेब भांडवलकर मल्हारी भांडवलकर यांनी परिश्रम घेतले.आवश्यक खर्च टाळून साखरपुड्यात विवाह केल्याबद्दल भांडवलकर शिंदे कुटुंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group