हनुमान जयंती निमित्त छत्रपती शिवाजी तरुण मंडळ सावंत गल्ली यांच्या वतीने जन्मोत्सव सोहळा महाप्रसादाचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी
हनुमान जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ, सावंत गल्ली यांच्या वतीने गुरुवार (दि. २ एप्रिल २०२६) रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पहाटे ५.३० ते ६.३० या वेळेत ह.भ.प. राजेंद्र महाराज भोसले (कंदर) यांचे जन्मोत्सवानिमित्त हरी कीर्तन होणार आहे. त्यानंतर सकाळी ८.०० ते १०.०० या वेळेत भव्य दिंडी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
त्यानंतर सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत ह.भ.प. मारुती महाराज निंबाळकर (वांगी) यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, दुपारी १२.०० ते ३.०० या वेळेत महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे.
या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा, असे आवाहन आयोजक छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ, सावंत गल्ली, करमाळा यांच्या वतीने करण्यात आले आहे.


