Tuesday, March 31, 2026
Latest:
करमाळा

महिलादिनानिमित्त जेऊर येथे हिरकणी स्पर्धा उत्साहात संपन्न अपेक्षा अवसरे प्रथम

जेऊर प्रतिनिधी 
महिलादिनानिमित्त जेऊर येथे आयोजित हिरकणी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत अपेक्षा अवसरे यांनी प्रथम क्रमांक पटकावत ३२ इंच स्मार्ट एलईडी टीव्हीचे पारितोषिक जिंकले.
या कार्यक्रमाचे आयोजन ॲड. सविता शिंदे, विजया कर्णवर, उज्ज्वला मेहता, माया कदम, कोमल गोरे, आरती शिंदे आदींनी केले होते. विविध गुणदर्शन स्पर्धेत दीपाली वाघमोडे यांनी द्वितीय, मनीषा लोंढे यांनी तृतीय तर विशाखा मेहता यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले, अशी माहिती ॲड. सविता शिंदे यांनी दिली.
कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये माया झोळ, डॉ. विद्या दुरंदे, विद्या बारकुंड, डॉ. भारती हजारे, एलिझाबेथ असादे, रेश्मा भोगे, ॲड. संगीता यादव, जयश्री सलगर, वर्षा सोनवणे, पूनम शिंदे, विद्या सरडे, अपेक्षा ॲड., लता गावडे आदींचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उज्ज्वला मेहता होत्या, तर प्रमुख पाहुण्या म्हणून पंचायत समिती करमाळा तालुका अभियान व्यवस्थापक सुषमा बिचुकले उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. सविता शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन विजया कर्णवर यांनी तर आभार प्रदर्शन आरती शिंदे यांनी केले. विविध स्पर्धांचे संचालन ॲड. कोमल गोरे, समीना शेख, सुजाता जाधव यांनी केले. परीक्षक म्हणून विजयमाला चवरे, गीता कापडी, वीणा देवी, ॲड. संगीता यादव यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वाती सपकाळ, ॲड. दीपाली पन्हाळकर, ॲड. भाग्यश्री वाशिंबेकर आदींनी सहकार्य केले. सर्व महिलांसाठी सचिन निमगिरे यांनी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती.
स्पर्धेत सहभागी व विजेत्या महिलांना आयोजकांच्या वतीने टीव्ही, डिनर सेट, मूर्ती, किचनवेअर आदी भेटवस्तू देण्यात आल्या. स्वामी विवेकानंद पतसंस्थेने सभागृह उपलब्ध करून दिले होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!