पोमलवाडी नळ पाणीपुरवठा योजने करीता शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्हा परिषद सोलापूर यांच्या अधिपत्त्याखाली 1 कोटी 10 लक्ष 37 हजार इतका निधी मंजूर
पोमलवाडी प्रतिनिधी पोमलवाडी ता.करमाळा येथील नळ पाणीपुरवठा योजने करीता महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्हा परिषद सोलापूर यांच्या अधीपत्त्याखाली 1 कोटी 10 लक्ष 37 हजार इतका निधी मंजूर झाला आसून त्या कामाची टेंडर प्रक्रिया झाली आहे. येत्या एक ते दोन महिन्यात प्रत्यक्षात या कामाला सुरुवात होणार आहे.या कामासाठी माजी आमदार नारायण आबा पाटील,जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हा परिषद सदस्या सावितदेवी राजेभोसले यांनी जिल्हा परिषद अंतर्गत पाठपुरवठा करून पोमलवाडी गावासाठी ही योजना मंजूर केल्याबद्दल पोमलवाडी ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्या वतीने आभार मानले आहे.
