राजुरी जलजीवन-पाणी पुरवठा योजनेसाठी आमदार संजयमामा शिंदे यांचे माध्यमातुन मिळाले एक कोटी एक्कोनपन्नास लाख रुपये- सरपंच डाॅ.अमोल दुंरदे
करमाळा प्रतिनिधी राजुरी ता- करमाळा येथील नविन नळ-पाणी पुरवठा योजनेसाठी जलजीवन योजनेतुन आमदार. संजयमामा शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली तब्बल १ कोटी ४९ लाख रुपयांची मंजुरी मिळाली आहे. याबाबत सरपंच डाॅ. अमोल दुरंदे यांनी माहिती दिली. मौजे. राजुरी ता- करमाळा या गावामधे पाच वर्षात अनेक सोईसुविधा निर्माण केलेल्या असुन, कोट्यावधी रुपयांची विकासकामे करून गाव सुजलाम-सुफलाम केलेले आहे. पाच वर्षाच्या कालावधीत गावचे रूप सुंदर केलेले असुन रस्ते, पाणी, गटार योजनां सह सर्व मुलभुत सुविधा या करीता कोट्यावधी रुपयांची कामे करता आली याचा आनंद असुन, यावेळी आम्हाला आमदार. संजयमामा शिंदे यांचे वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शन मिळाले आहे.. जलजीवन योजनेच्या माध्यमातुन
राजुरी गावाची नविन पाणीपुरवठा योजना गावात आणि प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प या योजनेतुन सार्थकी ठरला जाइल असेही सांगितले आहे.
