करमाळाशैक्षणिकसकारात्मक

सीबीएसई बोर्डच्या दहावीच्या परीक्षेत कु. कनिष्का प्रविण वीर हिचा इंग्रजी विषयात देशात प्रथम क्रमांक

 

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील लीड स्कूलची विद्यार्थीनी कु. कनिष्का प्रविण वीर ही सी. बी. एस. ई. बोर्ड, दिल्ली च्या दहावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकावून नॅशनल टॉपर ठरली आहे.सी.बी.एस.ई. दहावीच्या परीक्षेत तिने सर्व विषयात मिळून ९६.८० टक्के गुण मिळवून लीड स्कुलमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. दहावीच्या परीक्षेच्या तयारीसाठी तिला लीड स्कूल, करमाळा चे प्राचार्य आतिष क्षीरसागर सर, शिल्पा मॅडम, समता मॅडम, क्लासटिचर विनोद भांगे सर, माधुरी भांगे मॅडम, इब्राहिम मुजावर सर, प्रा. शिवाजी दळवी सर, राणी कोंढारे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. दहावीत मिळालेल्या उज्वल यशामुळे लीड स्कूलचे डायरेक्टर सुमित मेहता, सी.ई.ओ. स्मिता देवरा तसेच नितीन जिंदाल, रघू सर, अश्विनी मॅडम यांनी कु. कनिष्का वीर हिचे अभिनंदन केले असून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच करमाळ्यातही सर्व स्तरातून तिचे अभिनंदन केले जात आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group